
Nagar News : खरिपातील पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यंदा नगर जिल्ह्यात ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. सर्वाधिक सहभाग दुष्काळाच्या कायम झळा सोसत असलेल्या पारनेर, पाथर्डी, कर्जत तालुक्यांतून झाला आहे.
नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र असून यंदा ५ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले, तर भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जाते. यंदा राज्य शासनाने विमा हप्त्याचा भार उचलत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत विमा उतरवण्याची संधी उपलब्ध करून दिली.
त्यामुळे यंदा उशिराने पाऊस व उशिराने पेरण्या होऊनही पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तीन दिवसांच्या मुदतवाढीनंतर बुधवारपर्यंत (ता. ३) विमा भरण्याची मुदत होती.
अखेरपर्यंतचा शेतकरी सहभाग पाहिला तर गतवर्षीच्या तुलनेत नगर जिल्ह्यात पाचपटीने अधिक शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षी केवळ सव्वादोन लाख शेतकरी सहभागी झाले होते.
कृषी विभागातून दिलेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टरवर क्षेत्रावर विमा उतरवला आहे. यापोटी सरकार विमा कंपन्यांना ४५२ कोटी ४६ लाख ९० हजार रुपयांचा विमा हप्ता देईल.
या रकमेतून ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टरसाठी ३ हजार ३२८ कोटी ७९ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. यंदा पीकविम्यात पारनेर, पाथर्डी, कर्जत तालुक्यांतून सर्वाधिक सहभाग नोंदवला असल्याचे दिसत आहे.
तालुकानिहाय शेतकरी सहभाग (कंसात हेक्टर क्षेत्र)
अकोले ५६,२१२ (३१,५३२)
जामखेड ९४,५२७ (५०,१२०)
कर्जत १,१६,२५७ ( ६०,०७९)
कोपरगाव ५२,४४९ (३८,१२०)
नगर ८०,५०८ (५४,१५१)
नेवासा ९०,३८० (६३,७२२)
पारनेर १,४५,१२४ (६९,८२७)
पाथर्डी १,२६,२८५ (५७,३९५)
राहाता ४६,८२५ (३४,३२३)
संगमनेर ८३,६५५ (४५,९९९)
शेवगाव ९२,०१३ (५३,३७२)
श्रीगोंदा १,०३,८६१ (५४,३३९)
श्रीरामपूर ३१,६०० (२६,०५३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.