Horticulture : आटपाडीत इतर फळपिके लागवडीकडे कल

आटपाडी तालुका आवर्षण प्रवण तालुका असून वर्षभरात जेमतेम २०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे कोरडे हवामान आणि कमी पाण्यावर येणारी पिके शेतकरी घेत होता.
Horticulture Scheme
Horticulture SchemeAgrowon
Published on
Updated on

Fruit Crop Cultivation आटपाडी, जि. सांगली ः तालुक्यातील शेतकरी टेंभू योजनेच्या (Tembhu Irrigation Scheme) पाण्याच्या जोरावर डाळिंबासोबतच (Pomegranate) दुसरा फळ पिकाचा (Fruit Crop) पर्याय शोधू लागला आहे. यंदा डाळिंबाबरोबरच आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit), सीताफळ बोर याचीही प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाली आहे.

आटपाडी तालुका आवर्षण प्रवण तालुका असून वर्षभरात जेमतेम २०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे कोरडे हवामान आणि कमी पाण्यावर येणारी पिके शेतकरी घेत होता.

साहजिकच कमी पाण्यावर येणारे डाळिंबाचे क्षेत्र वाढले. मात्र, गेल्या तीन वर्षांत वाढलेल्या पावसामुळे मर आणि पिन बोर रोगामुळे डाळिंबाच्या हजारो हेक्टर बाजार वाळून गेल्या. डाळिंबच धोक्यात आल्याची परिस्थिती आहे.

Horticulture Scheme
Horticulture : फलोत्पादनासह जपला एकात्मिक शेतीचा पॅटर्न

तालुक्यातील शेतकरी संकट आले म्हणून न थांबता टेंभूच्या पाण्याचा उपयोग करून डाळिंबासोबतच इतर पिकांचा शोधू घेऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणावर इतर विविध फळपिकांची लागवड वाढत आहे.

यात प्रामुख्याने आंबा, केळी, सीताफळ, द्राक्ष, चिकू, चिंच, लिंबू, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, बोर, काजू, नारळ अशी या भागात यापूर्वी कधीही न घेतलेली लागवड करू लागला आहे. यांचे क्षेत्र वाढतच चालले आहे.

Horticulture Scheme
Horticulture Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज

एकट्या कृषी विभागाकडून ‘रोहयो’तून डाळिंबासह इतर सर्व फळपिकांची अकराशे हेक्टर क्षेत्रावर यंदा लागवड झाली आहे. अजूनही लागवड सुरूच आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी अनुदानाशिवाय लागवडी केल्या असून ते क्षेत्र वेगळेच.

यंदा डाळिंबाची विक्रमी ६४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्या खालोखाल आंब्याची ८८ हेक्टर, सीताफळ २५ हेक्टर, द्राक्ष ११० हेक्टरमध्ये लागवड केली आहे.

Horticulture Scheme
Horticulture Crop : धुमाळवाडी झाले फळबागांचे गाव

तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आणि प्रयोगशील आहे. त्यामुळेच डाळिंबाला पर्याय शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड झाली आहे. काही प्रमाणात त्याला यशही येऊ लागली आहे.

डाळिंब वगळून इतर लागवड केलेल्या फळ पिकांचे एक दोन वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. त्यात शेतकऱ्यांना यश मिळाल्यास इतर फळपीक लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार यात शंका नाही.

यंदा लागवड झालेले फळ पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

डाळिंब - ६४३, द्राक्ष - १५०, सीताफळ - १५०, केळी - २५, बोर - २५, नारळ - २५, ड्रॅगनफ्रूट - ५, पेरू - ५०, लिंबू - १५, आंबा - १४०, चिकू - ६, चिंच - ५०

मर आणि पिन बोर रोगामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. डाळिंबाची लागवड साडेसहाशे हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्याच्यासोबतच टेंभूचे पाणी आल्यामुळे या भागात कधीही नसलेली द्राक्ष, आंबा, केळी, बोर, सीताफळ, चिकू या फळपिकांची लागवड वाढू लागली आहे.

- पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com