Horticulture Crop : धुमाळवाडी झाले फळबागांचे गाव

सातारा जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता होईल तशी ऊसक्षेत्रात वाढ दिसत आहेत. मात्र धुमाळवाडी (ता. फलटण) या परिस्थितीला अपवाद ठरले आहे. ऊस न घेता गावाने एकूण क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर विविध फळबागा विकसित केल्या आहेत.
Horticulture Crop
Horticulture CropAgrowon
Published on
Updated on

Horticulture Crop सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात पाण्याची उपलब्धता (Water Availability) वाढल्याने ऊसक्षेत्रात (Sugarcane Acreage) वाढ झाली आहे. तालुक्यातील धुमाळवाडी मात्र त्यास अपवाद असून, फळपिकांसाठी (Horticulture Crop) प्रसिद्ध गाव म्हणून ते पुढे आले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १३०० आहे.

गावच्या बाजूनी कॅनॉल (Canal Irrigation) गेला असला, तरी सर्वाधिक विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर शेती बागायत केली जाते. पूर्वीच्या काळात डाळिंबाचे क्षेत्र मोठे होते. मात्र तेलकट डाग रोगामुळे क्षेत्रात घट होऊन अन्य फळबागांकडे शेतकरी वळले.

Horticulture Crop
Horticulture Scheme : फळबाग योजनेसाठी ४२ कोटी देण्यास मान्यता

सन २००० मध्ये गावात फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. डाळिंबाची जागा सीताफळ, पेरू, आंबा, अंजीर, आवळा, कलिंगड, द्राक्ष, जांभूळ, केळी, चिंच, ॲपल बोर, ड्रॅगन फ्रूट, नारळ आदी पिकांनी घेतली आहे.

गावचे क्षेत्र १७०० हेक्टर असून, त्यातील अवघे ३७१ हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली आहे. पैकी २५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर फळबाग लागवड आहे. पाण्याचे महत्त्व माहीत असल्याने ठिबक सिंचनाचाच वापर केला जातो.

फळबागांचा वारसा जपला

धुमाळवाडीत घरच्या जुन्या पिढीने जपलेला शेतीचा वारसा तरुण पिढीने जपला आहे. सध्या गावात ९० टक्के तरुण शेतीत असून, अवघे दहा टक्के तरुण नोकरी करीत आहेत.

या फळबाग शेतीतून कुटुंबाचा आर्थिक स्तर सुधारला असून, शेतकऱ्यांनी टुमदार बंगले बांधले आहेत. शासकीय कार्यालयही सुंदरपणे उभी राहिली आहेत. राजाराम पवार यांनी तर आपल्या बंगल्याला ‘फ्रूट पॅलेस’ असे नाव दिले आहे.

Horticulture Crop
Banana Crop Insurance : फळबाग पडताळणीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा सव्वा कोटी रुपये हप्ता जप्त

धुमाळवाडी गावातील शेतीची वैशिष्ट्ये

१) सीताफळ, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, नारळ आदींची विविधता. कलिंगड, हरभरा, कांदा आदी आंतरपिके.

२) फळपिकांना शंभर टक्के ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर.

३) फळबागेस झेंडू, फुले, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आदी पिके. पाण्याची उपलब्धता असतानाही ऊस घेतला जात नाही.

४) चारही बाजूंनी डोंगर असल्याने दगड फोडून शेती विकसित. जमीन मुरमाड.

५) शेतीत यांत्रिकीकरण. साठहून अधिक टॅक्ट्रर्स. फवारणीसाठी ‘ब्लोअर्स’चा वापर.

६) कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण व फळबाग लागवड, प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेटी यांचा शेतकऱ्यांकडून लाभ.

कृषी सहायक सचिन जाधव यांची मदत.

१) सतत नावीन्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती असल्याने येथील शेतकरी प्रदर्शन, राज्यातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत असतात.

२) फळबाग केंद्रित शेती पद्धतीतून वर्षाकाठी नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल.

३) गावातील शरद निकम यांची द्राक्षे परदेशात निर्यात होतात.

४) गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे दररोज १०० ते १५० मजूर बाहेरून आणले जातात.

५) फळे बाजारपेठेत पाठवण्यासाठी सहा मोठी, पाच पिकअप व सहा तीन चाकी मालवाहू गाड्यांची खरेदी.

अशा प्रकारे वाहतूक व्यवस्था तयार झाल्यामुळे शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होते. या यंत्रणेमुळे युवा शेतकऱ्यांना शेतीसह वाहतुकीचा पूरक व्यवसाय मिळाला आहे.

५) शेतीला पूरक शेळी, गायी, म्हशी, देशी कोंबड्याचेही संगोपन.

६) प्रतिदिन तीन ते चार हजार लिटर दूधसंकलन.

७) गाव सामाजिक कामातही अग्रेसर. ग्रामस्वच्छता अभियान पुरस्काराने सन्मान.

Horticulture Crop
Horticulture Scheme : फळबाग योजनेसाठी ४२ कोटी देण्यास मान्यता

बाजारपेठेत स्वतंत्र ओळख

धुमाळवाडी गावातील दर्जेदार फळांची बाजारपेठेत स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली आदी मोठ्या शहरांतील व्यापारी जागेवरून येऊन खरेदी करतात.

एकाचवेळी मोठ्या प्रमाणात त्यांना माल उपलब्ध होतो. साहजिकच चांगले दर मिळवण्यात शेतकरी यशस्वी होत असतात. पुणे, कऱ्हाड, लोणंद येथील प्रदर्शनांत फळांचे प्रथम क्रमांक गावातील शेतकऱ्यांनी मिळवले आहेत.

आमच्या गावात दहा ते १५ प्रकाराच्या फळांचे उत्पादन होते. त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण चांगल्या प्रकारे उंचावले आहे. माझ्याकडे सीताफळ, अंजीर, पेरू असून त्यातून प्रगती साधता आली आहे.
पल्लवी राजाराम पवार सरपंच, धुमाळवाडी ९७६४५२७६१९
माझी सा़डेसात एकर द्राक्षशेती आहे. पाच वर्षांपासून निर्यातदारांमार्फत निर्यात करत आहे. द्राक्षांना ११० रुपये प्रति किलो दर मिळवण्यापर्यंत यश मिळवले याचे समाधान आहे.
शरद निकम, ७५०७८११९०७
तैवान पेरू, गोल्डन जातीचे सीताफळ, डाळिंब अशी विविधता आम्ही ठेवली आहे. जागेवर खरेदी होते. वाहतूक व्यवस्थाही चांगली असल्याने बाजारपेठेत माल लवकर पोहोचतो.
संजय धुमाळ (९५४५१५८९००), रवींद्र धुमाळ, संतोष धुमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com