Nashik DCC Bank : आमचा शेतीमाल घ्या; कर्जाच्या जाचातून मुक्त करा

Farmer Protest : जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी अधिकारी येऊन जमदाटी करतात. बळजबरीने कर्ज भरण्याची भाषा बोलत आहेत. आम्ही कुठली कर्ज बुडवण्यास इच्छुक नाही.
Nashik News
Nashik News Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी अधिकारी येऊन जमदाटी करतात. बळजबरीने कर्ज भरण्याची भाषा बोलत आहेत. आम्ही कुठली कर्ज बुडवण्यास इच्छुक नाही. मात्र आमच्या शेतीमालाला भाव नाही.

नैसर्गिक आपत्तीमुळे आमचे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने किंवा जिल्हा बँकेने यावे, आमचा शेतमाला घेऊन व तिकडेच विक्री करावा आणि त्यापोटी भरणा करून आम्हाला कर्जमुक्त करावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत.

Nashik News
Nashik DCC Bank : जिल्हा बॅंकेच्या नोटिसा बुडवल्या गोदावरी पात्रात

जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात १ जून २०२३ रोजी नाशिक येथे शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल आणि शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या नेतृत्वात धरणे उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महिला शेतकरी उपोषणस्थळी दाखल झाल्या होत्या. यात सहभागी होऊन ‘आमचा शेतीमाल घ्या, आम्हाला कर्जाच्या जाचातून मुक्त करा, अशी हाक महिला शेतकऱ्यांची सरकारला घातली.

शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी शासनाने घ्यावी व शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी या प्रमुख मागणीसाठी १ जूनपासून उपोषण सुरू आहे. या लढाईत कोणालाही आणि कशालाही न घाबरता आम्ही सहभागी झाल्याची भावना महिला शेतकऱ्यांनी होती. यामध्ये निफाड, चांदवड, नाशिक, दिंडोरी तालुक्यातील महिला सहभागी होता. या संघर्षासाठी इतर महिलांनी पुढे यावे, असेही या सहभागी महिलांनी सांगितले.

Nashik News
Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची स्‍थिती सुधारू दे, मग निवडणुकांचा विचार करा

या वेळी अनंत सादडे पाटील यांनी शेतीची आजपर्यंत झालेली लूट व सरकारच शेतकरी विरोधी धोरण याबाबत विस्तृत माहिती दिली. तर सांगली येथील रामराव आईतवडे यांनी हा कर्जमुक्ती लढा राज्यव्यापी व्यापी करावा लागेल, अशी भूमिका मांडली. याप्रसंगी समिती सदस्य दिलीप बापू पाटील सुडके, खेमराज कोर, रामराव मोरे, नंदू देवरे,

दत्ताजी गवळी, कैलास बोरसे, चींधु पाटील पगार, आनंदराव चौधरी, बाजीराव शिंदे, पांडुरंग पवार, नवनाथ गावले, नामदेव पवार, खंडेराव कातड पाटील, मच्छिंद्र जाधव, भाऊसाहेब भंडारे, सुनील देवरे, बाळासाहेब भंडारे, विनायक घोलप, दत्ताजी गवळी, समाधान मोरे, सरपंच प्रकाश देवरे, सटाणा बाजार समिती सभापती किरण देवरे, भगवंतराव भंडारे, केदा शिरसाठ, श्रावण शिरसाठ, बापू फटांगडे, प्रदीप पवार, एकनाथ धनवटे, एकनाथ चौधरी, उमाकांत शिंदे, गंगाधर शिंदे, संजय झाल्टे, निवृत्ती गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com