Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची स्‍थिती सुधारू दे, मग निवडणुकांचा विचार करा

Chhagan Bhujbal : बँकिंग नियमन अधिनियम १९४१ च्या कलम अकरामधून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाहेर येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू न करता या बँकेवर प्रशासक कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
Nashik District Bank
Nashik District BankAgrowon
Published on
Updated on

Nashik Bank News : बँकिंग नियमन अधिनियम १९४१ च्या कलम अकरामधून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाहेर येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू न करता या बँकेवर प्रशासक कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

याबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्र देऊन ही मागणी केली आहे.

Nashik District Bank
NDCC Loan Recovery : थकीत कर्ज वसुलीसाठी बँक कर्मचारी आक्रमक

नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर ३० जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे शासनाच्या सहकार विभागाने २३ मे २०२३ ला आदेश निर्गमित केले आहेत. जुलै २०२३ नंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असे म्हटले आहे.

‘सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशान्वये ३० जूननंतर या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

२०१७ ते मार्च २०२१ पर्यंत ही बँक रिझर्व्ह बँकेद्वारा विहित केलेली ९ टक्के भांडवल पर्याप्तता (CRAR) राखू शकलेली नाही. बँकेवर प्रशासक आहेत, असे असतानाही बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही.

अशात निवडणूक लागली तर बँकेची स्थिती आणखी डळमळीत होईल. बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे, बँकेचे थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासक मंडळाकडून चांगल्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com