Sugarcane FRP : ऊसदरावरून पुणे-सातारा मार्गावर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

ऊस दराच्या प्रश्नावर राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. सातारा जिल्ह्यात देखील स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

सातारा : ऊस दराच्या (Sugarcane FRP) प्रश्नावर राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलन करीत आहे. सातारा जिल्ह्यात देखील स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.७) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारा या मार्गावर रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) छेडले आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : यंदाही एकरकमी, की ‘एफआरपी’चे तुकडे?

राज्यामध्ये ऊसदराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सातारा महामार्गावर सकाळी दहा वाजता रोखला.

Sugarcane FRP
Sugarcane FRP: एकरकमी एफआरपीसाठी १७,१८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद

आंदोलकांनी आनेवाडी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करत ऊसदराचा प्रश्न निकाली काढा अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता आनेवाडी टोल नाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक शेतकरी संघटनेने रोखली.

शासनाचा निषेध करत साखर सम्राटांचा निषेध करत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे आनेवाडी टोल नाक्यापासून सातारच्या दिशेने लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com