Textile Industry : वस्त्रोद्योगाला खरेदीदरात कापूस पुरवू ः पाटील

देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्यागासाठी लागणारा कापूस कमी दरात मिळण्यासाठी राज्य सरकार कापूस खरेदी करून तो नियमित योग्य दरात उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
Textile Industry
Textile IndustryAgrowon

मुंबई : ‘‘देशातील वस्त्रोद्योगात (Textile Industry) महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्यागासाठी लागणारा कापूस (Cotton) कमी दरात मिळण्यासाठी राज्य सरकार कापूस खरेदी (Cotton Procurement) करून तो नियमित योग्य दरात उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Textile Industry
Cotton Rate : आयातशुल्क काढले, तरी कापूस दर टिकणार

‘टेक्नोटेक्स-२०२३’ कर्टन रेझर कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. या वेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, ‘फिक्की’चे अध्यक्ष मोहन कावरीय, ‘एसआरटीईपीसी’चे अध्यक्ष धीरज शहा आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करेल.

Textile Industry
Textile : वस्त्रोद्योगाच्या समस्यासंबधी नेमलेली समिती बरखास्त

खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्यात येईल. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार होईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग प्रदर्शन भरविण्यासाठी महाराष्ट्रात सेंटर उभारण्यात येईल.’’

Textile Industry
Textile Policy : राज्यात नव्या वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती

‘‘पीएम मित्र योजनेअंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन अंतर्गत मुंबईत २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-२०२३’ला राज्यशासन सहकार्य करेल,’’ असे पाटील यांनी सांगितले.

‘३६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट’

‘‘वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरू आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगारनिर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ असेही पाटील म्हणाले.

‘वस्त्रोद्योगात रोजगारनिर्मितीची संधी’

केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, ‘‘भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास १३ टक्के आहे. जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘पीएम मित्र’ या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com