Maharashtra cooperative bank : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल; अजित पवारांचे नाव वगळले

ED filled chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने पुरवणी दोषारोपत्र दाखल केला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याचे नाव नाही. त्यामुळे पवारांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
Maharashtra cooperative bank
Maharashtra cooperative bankAgrowon
Published on
Updated on

Ajit Pawar News : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या दोषा आरोपपत्रात एकूण १४ जणांचा समावेश असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra cooperative bank
Harihareshwar Cooperative Bank Satara : आरबीआयकडून साताऱ्यातील एका सहकारी बँकेचा परवाना रद्द

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ( Maharashtra Co operative Bank Scam) गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण तापले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आल्याने त्यांच्यावर विरोधीपक्षांकडून वेगवेगळे आरोप करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान, १२ एप्रिल २०२३ रोजी ईडीने अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात अजित पवारांचे नाव नव्हते. पण, पुरवणी आरोपपत्र त्यांचे नाव असल्याची शक्यता असल्याची चर्चा होती. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

Maharashtra cooperative bank
Ajit Pawar : राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने फटकारले, अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

दरम्यान, गुरुवारी ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये १४ जणांच्या नावाचा समावेश आहे. त्यात अजित पवारांचं नाव नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, भाजपचे आमदार सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज, समीर मुळ्ये, अर्जून खोतकर यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.

या प्रकरणी ईडीने कोणतिही प्रतिक्रिया देण्यास टाळले. पण आणखी कोणी आरोपी आढळल्यास पुन्हा पुरवणी आरोपपत्राद्वारे नावाचा समावेश केला जाऊ शकतो, असं ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com