Ajit Pawar : राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने फटकारले, अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

Ed Court : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी फायदा कसा झाला? असा सवाल करत विशेष पीएमएलए कोर्टाने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar-sunetra Pawar
Ajit Pawar-sunetra PawarAgrowon
Published on
Updated on

PMLA Special Judge : जरंडेश्वर साखर कारखान्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व इतरांनी 226 कोटींचं कर्ज दाखवले होते. कारखान्याच्या मालमत्ता विक्री प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्राला स्वीकारत वप्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांनी आपले निरीक्षण सांगत काही लोकांना समन्स बजावले आहेत.

Ajit Pawar-sunetra Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार ; निवडणूक आयोगाकडे याचिका

ईडी चार्जशीटनुसार या व्यवहाराच्या माध्यमातून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी मोठा फायदा झाला. तसेच हा साखर कारखाना कवडीमोल भावात मिळाला आहे. या साखर कारखान्याच्या नावावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 826 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले. एकेकाळी बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते. या बँकेकडून मिळालेला पैसा हा मनी लाँडरींगसाठी वापरला गेला. तो पैसा परदेशातही पाठवला गेला. असे ईडीच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

Ajit Pawar-sunetra Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : भाजपचं हिंदुत्व विखारी आणि समाजात फुट पाडणारं; भाजपसोबत जाऊ शकत नाही... शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

ईडीच्या चार्जशीटमध्ये नमूद केले आहे की , महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक या शिखर बँकेकडून जेव्हा जरंडेश्वरची मालमत्ता ताब्यात घेतली. ती प्रॉपर्टी लिलावात मुंबईच्या गुरु कॉमोडीटीज कंपनीने घेतली. त्यानंतर कंपनीने काही महिन्यात हा साखर कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला दिला. या कंपनीचा मालक स्पार्किंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड आहे. या स्पार्किंग सॉईलमध्ये एकेकाळी अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संचालक होत्या.

या प्रकरणावरून न्यायालयाने अजित पवार ज्या कंपनीत संचालक होते, त्याच कंपनीला म्हणजे स्पार्किंग सॉई लिमिटेडलाच हा कारखान कसा मिळाला? असा सवाल केला आहे. त्यासोबतच वेळोवेळी महराष्ट्र शिखर बँकेने जरंडेश्वरला कर्ज दिले. त्यातील 80 कोटी थकबाकी असताना या कंपनीचा लिलाव केला गेला. त्यानंतर याच साखर कारखान्याच्या नावावर 826 कोटी रुपये कर्ज काढून गुरु कॉमोडीटीजला दिले गेले हे ईडीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com