Sugarcane Labor : ऊस तोडणी कामगार परतीच्या मार्गावर

एप्रिल महिना सुरू झाल्याने साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे.
Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon
Published on
Updated on

Pune News एप्रिल महिना सुरू झाल्याने साखर कारखान्यांनी (Sugar Mill) आपला गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ३१ साखर कारखान्यांनी हंगाम आपोटला असून कारखानास्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

सध्या अवघा एक साखर कारखाना सुरू असल्याने तोडणी मजूर (Sugarcane Labor) परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. येत्या आठ दिवसांत सुरू असलेला साखर कारखानाही बंद होईल, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात १५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गळीत हंगामास सुरुवात झाली होती. यंदा सुमारे साडेपाच महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३२ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच लगबग पहावयास मिळाली होती. किराणा दुकाने, हॉटेल यांचाही ऊस हंगामात तेजीत धंदा सुरू होता.

Sugarcane Labor
Sugarcane Season : ऊसतोड मुकादमांकडून ४४६ कोटींची फसवणूक

विभागात पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने १७ फेब्रुवारी, तर भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याने २५ फेब्रुवारी, अनुराज शुगर्स २७ फेब्रुवारी, साताऱ्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना ३ फेब्रुवारी, शरयू अॅग्रो ७ मार्च, खटाव माण तालुका अॅग्रोने १३ मार्च रोजी गळीत हंगाम बंद केला.

जिल्ह्यात अजूनही काही भागात थोड्याफार प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे. मात्र, कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यात अजून मे अखेरपर्यंत गळीत हंगाम आटोपला जाण्याची शक्यता आहे. सध्या काही ठिकाणी कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकांनातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

यंदा उसाच्या गाळप हंगामासाठी विभागात एकूण सहकारी १९ व खासगी १३ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६७ हजार ३०० मेट्रीक टन एवढी होती. यंदा उसाची वाढलेली उपलब्धता लक्षात घेता उशिराने साखर कारखाने बंद होण्याचा अंदाज होता.

Sugarcane Labor
Sugar Mill Loan : सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन लोन

परंतु अतिपावसाचा फटका उसाला बसल्याने ३ फेब्रुवारीपासून कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपवण्याचा धडाका सुरू केला आहे.

आतापर्यंत बंद झालेल्या साखर कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने बंद झाले असून साताऱ्यातील १४ कारखान्यांचा समावेश आहेत, असे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

हंगाम दृष्टिक्षेपात...

आतापर्यंत पुणे विभागात झालेले उसाचे गाळप

एकूण सुरू झालेले साखर कारखाने -- ३२

दैनंदिन गाळप क्षमता, टनात -- १,६७,३००

एकूण ऊस गाळप, टनात -- २,२३, ८०,२७४

साखर उत्पादन, क्विंटलमध्ये -- २,२६,७६,६६०

सरासरी साखर उतारा, टक्के -- १०.१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com