Sugarcane Season : पुणे विभागात गळीत हंगाम वेगात सुरू

गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन होत आले आहे. या कालावधीत पुणे विभागातील एकूण ३१ साखर कारखान्यांपैकी २८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

पुणे ः गळीत हंगाम (Sugarcane Season) सुरू होऊन जवळपास दोन होत आले आहे. या कालावधीत पुणे विभागातील एकूण ३१ साखर कारखान्यांपैकी (Sugar Mill) २८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. सध्या गळीत हंगाम वेगात सुरू असून, बारामती अॅग्रो (Baramati Agro) हा ऊसगाळपात आघाडी घेतली आहे.

Sugarcane Season
Sugarcane FRP : ‘घोडगंगा’ची पहिली उचल प्रतिटन अडीच हजार रुपये

आतापर्यंत या साखर कारखान्याने सहा लाख १४ हजार १८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून चार लाख ६४ हजार २५० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सरासरी साखर उतारा ७.५६ टक्के आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Sugarcane Season
Sugarcane FRP : ‘एफआरपी’बाबतचे गोड गैरसमज

परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. अनेक ठिकाणी उसामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू झाला. गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र ऊस शेतात पावसाळ्यात पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट येत आहे.

पुणे विभागात सातारा, पुणे भागांत उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे.

त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. सध्या सुरू झालेल्या कारखान्यामध्ये सहकारी १५ व खासगी १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६३ हजार ५५० टन एवढी आहे.

विभागाची गाळप स्थिती अशी...

विभागात आतापर्यंत सुरू झालेल्या २८ कारखान्यांनी ६७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ६० लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.०० टक्के एवढा आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली तरी कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा ११.०९ टक्के एवढा साखर उतारा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com