Sugarcane Season : पावसाने दडी मारल्याने गळीत हंगाम धोक्यात

Sugarcane Crushing Season : सध्या शेतात उभा असलेला ऊस पाण्या अभावी जळू लागला आहे तर नव्याने लागण करण्याचेही धाडस शेतकरी करू शकत नसल्याने पुढच्या हंगामाबाबत चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Solapur News : यंदाच्या पावसाळ्यात जवळपास प्रत्येकच नक्षत्रात दमदार पावसाची अपेक्षा फेल जाताना दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही किरकोळ व रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे कृषी अर्थ व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम धोक्यात येऊ लागला आहे. सध्या शेतात उभा असलेला ऊस पाण्या अभावी जळू लागला आहे तर नव्याने लागण करण्याचेही धाडस शेतकरी करू शकत नसल्याने पुढच्या हंगामाबाबत चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

Sugarcane Crushing Season
FRP of Sugarcane : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून उसाची एफआरपी जाहीर, प्रतिक्विंटलसाठीचा दर निश्चित

यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडे यंदाच्या हंगामात गाळपासाठी ४ लाख ३८ हजार हेक्टरवरील उसाची नोंद झालेली आहे. बहुतांश शेतकरी एकाच उसाची नोंद विविध कारखान्यांकडे करतात.

त्यामुळे साखर कारखान्यांकडे उसाची नोंद जास्त होते. साखर कारखान्यांकडील उसाची नोंद व कृषी विभागाकडे असलेली माहिती याचा सारासार विचार करून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने यंदाच्या हंगामासाठी २ लाख ४० हजार हेक्टरवरील क्षेत्र गाळपासाठी निश्‍चित केले आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Labor : तीन वर्षे ऊसतोड केलेल्या कामगारांनी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी

गेल्या हंगामात बंद असलेले किंवा कमी गाळप केलेले कारखाने यंदाच्या हंगामात सुरू होण्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, बार्शी तालुक्यातील येडेश्‍वरी (आर्यन) शुगर, अक्कलोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू होण्याची शक्यता आहे.

पावसाने ओढ दिल्याने उसाचे पीक कमी झाले आहे. चारा म्हणून उसाचा वापर सुरू केला आहे. सध्या उसाला पाण्याची ओढ मिळाल्याने त्याचा फटका उसाच्या वजनावर बसण्याची शक्यता आहे.

आता लक्ष पुष्य नक्षत्राकडे

यंदाच्या पावसाळ्यातील जूनमधील मृग व आर्द्रा या दोन्ही नक्षत्रात पावसाने निराशा केली आहे. सध्या सुरू असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात पावसाने कमी अधिक प्रमाणात किमान हजेरी तरी लावली. या पावसामध्ये सातत्य नसल्याने त्याचा परिणाम खरिपांच्या पेरण्यांवर झाला आहे. गुरुवारपासून (ता.२०) पुष्य नक्षत्राला सुरवात होत आहे. या नक्षत्रात तरी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com