Mango Market : वाशी बाजारातील हापूस दरात होणारी घसरण थांबवा

आवक वाढल्यामुळे वाशी बाजारातील हापूसच्या दरात होणारी घसरण थांबवण्यासाठी रत्नागिरीतील उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधला.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon
Published on
Updated on

Mango Market Update :आवक वाढल्यामुळे वाशी बाजारातील हापूसच्या दरात (Hapus Rate) होणारी घसरण थांबवण्यासाठी रत्नागिरीतील उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधला.

त्यात काही अंशी यश आले असून वाशीतील व्यावसायिकांनीही सध्याचे दर (Mango Rate) स्थिर ठेवले जातील, असे आश्‍वासन दिले आहे.

त्यामुळे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात उत्पादन (Mango Production) कमी असल्यामुळे दरावर नियंत्रण राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

यंदा तुलनेत उत्पादन कमी असल्याने आंबा बागायतदारांना त्याचे नुकसान होते. या परिस्थितीत हापूसचे (Alphanso) घसरणारे दर ही चिंतेची बाब आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी वाशी येथे झालेल्या बैठकीत बाजार समितीमधील व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रत्नागिरीमधून जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, राजेंद्र कदम, जितेंद्र पाटील, प्रसन्न पेठे, बावाशेठ साळवी यांनी प्रश्‍न मांडले.

Hapus Mango
Mango Market : वाशीत ६० हजार आंबा पेटी आवक

कोकणामधून वाशी बाजारात गतवर्षी २१ हजार पेटी जात होती. यंदा ४० हजाराहून अधिक पेटी येत आहे. त्यामध्ये १५ हजार पेटी ही रत्नागिरीतील असून उर्वरित सिंधुदुर्गसह अन्य जिल्ह्यातील आहे.

आताचा दर पाच डझनच्या पेटीला ४००० रुपये दर आहे. कमीत कमी दर १५०० रुपये आहे. १५ एप्रिलनंतर उत्पादन कमी होणार हे निश्‍चित आहे. त्यावेळीही बाजारातील दर टिकणे आवश्यक आहे.

Hapus Mango
Hapus Mango Market : हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले

अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक अडचणीत येईल. यामध्ये फळाच्या मोठ्या आकाराला दर अधिक पण छोट्या फळाला दर मिळत नाही. दरातील या तफावतीमुळे बागायतदार अडचणीत येत आहेत.

पाच डझनपेक्षा सहा ते आठ डझनाचे दर प्रत्येकी पाचशे रुपयांनी कमी करतात. तो दर वाढवणे आवश्यक आहे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वाशीतील व्यावसायिकांनी चर्चा केली आणि त्याबाबत काही सूचनाही केल्या. यावर बाजार समितीचे संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे म्हणाले, ग्राहकांच्या मागणीवर दराची स्थिती अवलंबून राहते.

तरीही जास्तीत जास्त दर स्थिर राहतील यादृष्टीने सर्वच व्यावसायिक प्रयत्न करतील. मोठ्या फळांमध्ये साका निघतो त्यामुळे तो माल जास्तीत जास्त स्थानिक बाजारात विकला जातो तर छोटा निर्यातीला देतात.

आंतरराष्ट्रीयस्तरावर आठवड्याला दर कमी-अधिक होतात. माल तिथे पोचेपर्यंत दर बदललेले असतात. त्यामुळे निर्यातदारही भविष्याचा विचार करूनच वाशीतून माल उचलतो.

दराविषयीची बैठक यंदा उशिराने झाली. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात याच पद्धतीने कोकणातील सर्व बागायतदारांशी त्या-त्या ठिकाणी बैठका घेऊ. जेणेकरून दर स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक मालाचा दर्जा, माल वाशीमध्ये वेळेत पोचण्याचे नियोजन, पेट्यांची भरणी यावर मार्गदर्शन करता येईल. जेणेकरून कमी दर्जाचा मालामुळे दर कमी करावे लागणार नाहीत.
- संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com