Mango Market : वाशीत ६० हजार आंबा पेटी आवक

पाडव्याच्या मुहूर्तावर आवक वाढली; डझनाला हापूस ४०० ते १२०० रुपये
Mango Market
Mango MarketAgrowon

रत्नागिरी ः गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर वाशी येथील बाजार समितीत विविध प्रकारच्या आंब्यांची आवक (Mango Arrival) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा गुडीपाढव्याला अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत. बुधवारी (ता. २२) सुमारे ६० हजार ८६८ आंबा पेट्या मार्केटमध्ये (Mango market) आल्या. यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ४८ हजार पेट्यांचा समावेश आहे.

त्यात देवगडीमधील सर्वाधिक ६० टक्के, रत्नागिरीतील वीस टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित वीस टक्के आंबा जातो. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधून वाशीत सुमारे १२ हजार पेट्या आल्या आहेत.


साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत कोकणातील बागायतदार व्यावसायिक दृष्टिकोन पाहून आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्याचे नियोजन करतो.

Mango Market
Mango Market : मुंबईत कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा

त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बऱ्यापैकी पेट्या कोकणातून जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.

Mango Market
Hapus Mango : देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

मार्चच्या पहिल्या आठवड्यांन राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील काही भागांतून आंबा वाशीकडे पाठविण्यास सुरुवात झाली; परंतु सिंधुदुर्गमधून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात गेल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसांमध्ये वाशीमध्ये ४० ते ६० हजारांच्या दरम्यान आंबा पेटीची आवक होत आहे. गुढीपाडव्याला मोठी वाढ झाली असून दरही दीड हजार ते ४ हजार रुपये पाच डझनच्या पेटीला मिळत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक असला तरीही दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.

एप्रिलमधील आवक घटणार
गेले तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कोकणातील काही भागातही हलका पाऊस झाला. त्याचा मोठा परिणाम आंब्यावर झाला नसला तरीही काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील पिकाला धक्का बसला आहे.

विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील पावस, जयगड परिसरातील बागायतदारांकडून अवकाळीचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात आवक बऱ्यापैकी असली तरी एप्रिल महिन्यात आवक कमी राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

यंदा गुढीपाडवा पंधरा दिवस अलिकडे आला असला तरीही वाशी बाजारातील आवक वाढलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.

ग्राहकांकडून प्रतिसादही चांगला मिळतोय. रमजान सुरू होत असल्याने आखाती देशांमधून मागणी वाढली असून निर्यातही सुरू झाली आहे.
- संजय पानसरे, वाशी बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com