मुख्यमंत्र्यांकडूनच नियमभंग

मुंबई बाजार समिती संचालक अपात्रतेला स्थगिती
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

पुणे : पणन कायद्यातील (Agriculture Marketing Act) तरतुदींनुसार राज्यातील कोणत्याही एका बाजार समितीचे संचालक (APMC Director) असल्याशिवाय मुंबई बाजार समितीचे संचालक (Mumbao APMC Director) म्हणून कामकाज करता येत नाही. या नियमानुसार राज्यातील ज्या बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा समित्यातील त संचालकांचे सदस्यत्व रद्द झाल्याने कायद्यानुसार ते मुंबई बाजार समितीचे संचालक पदी राहू शकत नाही. यानुसार सात संचालक अपात्र झाल्याच्या पणन संचालकांच्या आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नियबाह्य स्थगिती दिल्याची माहित समोर आली आहे.

Eknath Shinde
APMC Election : ‘शेतकऱ्यांना मतदाना’वरून भाजपमध्येच दोन मतप्रवाह

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५ ‘अ’ नुसार सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे. या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा उपनिबंधक बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करतात. यानंतर संबंधित कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सदस्य म्हणून असलेले पद संपुष्टात येते, त्यानुसार मुंबई बाजार समितीचे संचालक असलेल्या सात संचालकांचे मुळ बाजार समितीमधील संचालकपद संपुष्टात आले आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे मुंबई बाजार समितीचे संचालक पद सुद्धा संपुष्टात आले आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार पणन संचालकांनी सात संचालकांचे सदस्यत्व रद्द केले होते.

मात्र, या सात संचालकांनी पणन मंत्र्यांच्या पदभार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कायद्यातील तरतुदींना फाटा देत पणन संचालकांच्या आदेशाला नियमबाह्य स्थगिती दिली आहे. यामुळे ही नियमबाह्य स्थगिती चिघळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

नियम काय सांगतो...

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५ ‘अ’ नुसार सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे. या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा उपनिबंधक बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करतात. यानंतर संबंधित कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सदस्य म्हणून असलेले पद संपुष्टात येते.

अपात्र संचालक..- माधवराव जाधव (बुलडाणा)

- धनंजय वाडकर (भोर, पुणे)

- बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा)

- वैजनाथ शिंदे (लातूर)

- प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे)

- जयदत्त होळकर (निफाड नाशिक)

- अद्वय हिरे (नाशिक)नियम काय सांगतो...

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५ ‘अ’ नुसार सदस्यांचा नेहमीचा किंवा वाढीव कालावधी संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीची तरतूद आहे. या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा उपनिबंधक बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करतात. यानंतर संबंधित कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सदस्य म्हणून असलेले पद संपुष्टात येते.

अपात्र संचालक..- माधवराव जाधव (बुलडाणा)

- धनंजय वाडकर (भोर, पुणे)

- बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा)

- वैजनाथ शिंदे (लातूर)

- प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे)

- जयदत्त होळकर (निफाड नाशिक)

- अद्वय हिरे (नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com