
औरंगाबाद : राज्यातील बूथ, पक्ष संघटन मजबूत करण्याचा व सरकारच्या योजना (Government Sheme) जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मागील अडीच वर्षे राज्यात सरकार नव्हते, आताचे सरकार बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) गतीने काम करीत असल्याचे मत भाजपचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते. बावनकुळे म्हणाले, की मागील काम पूर्ण करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सरकारचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संघटनेचे आहे.
पक्षाला बहुमत मिळाले की पक्ष मोठा झाला ते कळत, ग्रामपंचायत निवडणुकीत २९४ जागांवर आमचे सरपंच निवडून आले. त्यांच्या नावानिशी माहिती आहे. काही पक्ष दावा करतात त्यांनी ती माहिती द्यावी.
सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही यश मिळाले. त्याचा अर्थ सरकारने सरपंच जनतेतून निवडून येण्याचा घेतलेला निर्णय जनतेला मान्य आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ रद्द केले.
विकास महामंडळ नसेल, तर अनुशेष कसा मांडला जाईल, अर्थसंकल्प कसा मंजूर होईल, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला.
‘‘अनेक प्रश्न घेऊन राज्य सरकार काम करत आहे. पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २४५ पेक्षा अधिक खासदार आणि राज्यात २०० पेक्षा अधिक आमदार व पूर्ण वेळ काम करणार सरकार निवडून येईल. महाविकास आघाडी सरकारने सिंचनासाठीच्या विजेचा खेळखंडोबा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळेल. श्री. फडणवीस आणि श्री. शिंदे यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला आहे. तसेच खातेवाटप मुख्यमंत्री ठरवितात, त्यामुळे कोणाला मंत्रिपद द्यायचे आणि कोणाला नाही हे ते ठरवतात.
त्यामुळे त्यांच्यात कोण नाराज आहे याबाबत सांगता येणार नाही. मात्र अशी नाराजी असल्याच्या वावड्या उठविल्या जातात. राज्याला काम करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. ओबीसी आरक्षण घालविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. कोणतीही निवडणूक लागल्यास आम्ही तयार आहोत.
एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार. दसरा मेळाव्याला मोदी-शहा यांना बोलावले असेल तर आनंद आहे. काँग्रेसने आजपर्यंत भाजप विषयी मुस्लिम समाजात अपप्रचार करत मत मिळविल्याचा आरोपही श्री. बावनकुळे यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.