Agriculture Department : एसएओ’ची संधी ८१ कृषी उपसंचालकांना मिळणार

कृषी खात्यात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
81 Deputy Directors of Agriculture will get the opportunity of 'SAO'
81 Deputy Directors of Agriculture will get the opportunity of 'SAO'Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः कृषी खात्यात (Agriculture Department) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) (SAO) दर्जाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या पदांवर काही अभ्यासू अधिकाऱ्यांसह एकूण ८१ उपसंचालकांना पदोन्नती दिली जाणार आहे.

81 Deputy Directors of Agriculture will get the opportunity of 'SAO'
कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंडले

महाराष्ट्र कृषी सेवेतून भरले जाणारे उपसंचालक पद सध्या ‘गट-अ’ संवर्गात आहे. तर एसएओ पद ‘गट-अ (वरिष्ठ)’ संवर्गात गणले जाते. वरिष्ठ संवर्गात पदोन्नती देताना सध्याच्या उपसंचालकांना त्यांच्या पसंतीचा विभाग देण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्यात सध्या पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण-१ व कोकण-२ असे सात कृषी विभाग अस्तित्वात आहेत. त्यापैकी कोणत्या एका विभागात नियुक्ती हवी, या बाबत आपापले पर्याय संबंधित उपसंचालकांनी मंत्रालयात सादर करावेत, असे सूचित करण्यात आले आहे.

81 Deputy Directors of Agriculture will get the opportunity of 'SAO'
Urad Damage : उडीद नुकसानीबाबत कृषी विभाग उदासीन

चांगल्या कामाला प्राधान्य
सध्या उपसंचालकांना पदोन्नतीची शक्यता तयार झाल्यामुळे क्षेत्रीय पातळीवर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘एसएओ’पद मिळणार आहे. या पदावर काम करण्याची संधी आता बालाजी ताटे, हरी बापतीवाले, पांडुरंग सिगेदार, प्रकाश देशमुख, दीपक कुटे, अनिल भोकरे, विजय कोळेकर, भाग्यश्री पवार, रवींद्र माने, दयानंद जाधव अशा काही जाणकार अधिकाऱ्यांना मिळू शकते.

81 Deputy Directors of Agriculture will get the opportunity of 'SAO'
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

पदोन्नतीसाठी पात्र ठरणाऱ्या इतर अधिकाऱ्यांची नावे अशी ः
दत्तात्रेय दिवेकर, डॉ. राहुल सातपुते, सुधाकर बोराळे, विवेक कुंभार, डॉ. मुरलीधर इंगळे, संजय काचोळे, संतोष डाबरे, डॉ. कांतप्पा खोत, वैभव तांबे, भाग्यश्री पवार फरांदे, पल्लवी देवरे कोंढाळकर, संगीता माने, ऊर्मिला राजपूत, शिरीष जाधव, रवींद्र कांबळे, रवींद्र देवरे, माणिक त्र्यंबके, विठ्ठल जोशी, अनिल देशमुख, दीपक कुटे, सुनीलकुमार राठी, चंद्रकांत गोरड, विकास बंडगर, दिलीप देवरे, रवींद्र पाठक, सुरेश भालेराव, प्रकाश सूर्यवंशी, दिलीप नेरकर, राकेश वाणी, विजय हिरेमठ, बलसागर तौर, जांबुवंतराव घोडके, विलास नलगे, सुधीर चव्हाण, शीवसांब लाडके, भीमराव रणदिवे, शांताराम मालपुरे, सर्जेराव तळेकर, सीताराम कोलते, रमेश जाधव, भीमाशंकर पाटील, पुरुषोत्तम उन्हाळे, अशोक बाणखेले, पंढरी डोखळे, विनायक पवार, जालिंदर पांगरे, विजयकुमार राऊत, संतोष नांदरे, रवींद्र राऊत, सागर खटकाळे, महेश झेंडे, दौलत चव्हाण, अनिल गवळी, गहिनीनाथ कापसे, महेश तिर्थकर, भास्कर कोळेकर, प्रशांत नाईक, भाग्यश्री नाईकनवरे, नीलेश भागेश्‍वर, वैशाली कुलकर्णी, ऊर्मिला चिखले, अर्चना निस्ताने, अजित आडसुळे, सुभाष साळवे, प्रीती हरळकर, मनोज ढगे, पुनम खटावकर, अनिसा महाबळे, शंकर किरवे, कुरबान तडवी, प्रवीण देशमुख, अरुण कांबळे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com