ST bus
ST busAgrowon

ST Bus : माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज

२५ जानेवारीला माघी गणेशोत्सव असून दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असणार आहे. त्यामुळे दोन दिवस भक्तांची; तसेच पर्यटनाची वाढती गर्दी पाहता एसटी महामंडळाने भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

पेण : ST Bus : माघी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) २५ जानेवारीला साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (ST CORPORATION) प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जास्तीच्या दहा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता प्रवाशांनी आरक्षण निश्चित करून घ्यावे, असे आवाहन एसटी (ST bus) महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अष्टविनायकांपैकी असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते.

२५ जानेवारीला माघी गणेशोत्सव असून दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असणार आहे. त्यामुळे दोन दिवस भक्तांची; तसेच पर्यटनाची वाढती गर्दी पाहता एसटी महामंडळाने भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे भक्तांमध्ये आनंद होत आहे. एसटीच्या आरक्षित दहा गाड्यांव्यतिरिक्त पेण डेपोच्या चार, रोहा येथील दोन, अलिबाग दोन आणि कर्जत दोन अशाही आणखी दहा बसेस पाली येथे प्रवाशांना जाण्यासाठी सज्ज आहेत.

त्यामुळे राखून ठेवल्या जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपले आरक्षण निश्चित करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc.gov.com या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे, असे महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.

ST bus
ST Bus Fare : ऐन दिवाळीत एसटीची भाडेवाढ
सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी गेली अनेक वर्षे प्रवाशांनी एसटीला पसंती दिली. माघी गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडल्या असून त्याचे आरक्षण करून लाभ घ्यावा.
दीपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com