ST Bus Fare : ऐन दिवाळीत एसटीची भाडेवाढ

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महामंडळाची ‘लाल परी’ अतिरिक्‍त फेऱ्या मारणार आहे. मात्र याच दिवाळीच्‍या गर्दीच्‍या हंगामात एसटीची भाडेवाढ केली आहे.
MSRTC
MSRTC Agrowon

जळगाव ः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महामंडळाची ‘लाल परी’ (MSRTC Bus) अतिरिक्‍त फेऱ्या मारणार आहे. मात्र याच दिवाळीच्‍या गर्दीच्‍या हंगामात एसटीची भाडेवाढ (St Bus Fare Hike) केली आहे. यामुळे यंदा लाल परीतून दिवाळीच्‍या (Diwali Festival) प्रवासाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर १० टक्के नैसर्गिक भाडेवाढ गुरुवार (ता. २०)पासून लागू झाली आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक जळगावला येत असतात. यामुळे रेल्‍वेच्‍या कित्येक गाड्यांचे आरक्षण फूल झाले आहे. शिवाय, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे.

MSRTC
एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंतची मुदत

यामुळे काही नागरिकांनी महामंडळाच्या बसला पसंती दिली. मात्र आता महामंडळाच्या बसचे देखील दर वाढल्याने नागरिक चिंतित झाले आहेत. २० ते ३० ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे.

MSRTC
ST Mahamandal : खड्ड्यांमुळे एसटी नादुस्‍तीचे प्रकार वाढले

५ ते ६५ रुपयांनी भाडेवाढ

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात येणार आहेत. मात्र महामंडळाने १० टक्के भाडेवाढ केल्‍याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यात प्रामुख्‍याने जळगावहून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ६०५ ऐवजी ६६५ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईसाठी ६३५ रुपयांवरून ७०० रुपये इतके भाडे झाले आहे. एकंदरीत महामंडळाने ५ ते ६५ रुपयांपर्यंत भाडेवाढ केली आहे.

पुणे मार्गावर रोज वीस बस

सुट्टीच्‍या कालावधीत पुणे येथून येणाऱ्यांची संख्‍या अधिक आहे. यामुळे या मार्गावर जळगाव विभागातून रोज २० बसचे नियोजन आखले आहे. यात जळगाव येथून सुटण्याची वेळ शिवशाही सकाळी ७.३०, ८.३०, रात्री ८.३०, सायंकाळी ५.३०, परिवर्तन सकाळी ५, रात्री ७.३०, तर शयनयान आसनी रात्री ९ ला जादा गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच पुण्याहून शिवशाही सकाळी ७, ८, सायंकाळी ५.३०, परिवर्तन रात्री ८, रात्री ९.३०, शयनयान आसनी रात्री ९ याप्रमाणे दिवाळीनिमित्ताने बस वाढविण्यात आल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com