Independence Day 2023: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानाची खुर्ची! स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी दिल्लीत विशेष आमंत्रण

Maharashtra Farmers Invited for Independence Day Celebrations : नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या ७६ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून २४ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
Independence Day
Independence DayAgrowon
Published on: 
Updated on: 

Special Invitation For Independence Day 2023 : गेल्या वर्षीच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला होता . यंदा आपण नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. या सोहळ्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

Independence Day
Tomato Farming : चिवट संघर्षातून टोमॅटो शेतीत पुढारले धुळवाड

स्वातंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून देशभरातील स्तरातील लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २४ शेतकऱ्यांना त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात आले.

लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ‘लोकसहभागा’च्या संकल्पनेनुसार समाजाच्या विविध घटकांतील आमंत्रित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यंदा या कार्यक्रमास १८०० व्यक्तींमध्ये या योजनेच्या २५० लोकांना त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेल्या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक तसेच पंतप्रधान संग्रहालय या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com