World Toilet day : शौचालय दिनानिमित्त राबविणार विशेष मोहीम

मोहिमेदरम्यान ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, एक शोषखड्डे असलेली शौचालय दोन शोषखड्डे शौचालयात रूपांतर केली जातील.
World Toilet Day
World Toilet DayAgrowon

सोलापूर : ‘‘जागतिक शौचालय दिनानिमित्त (World Toilet Day) १९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-दोन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांत हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी, वैयक्तिक शौचालयाचा वापर, (Toilet Use) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (DIlip Swami) यांनी दिली.

World Toilet Day
Agricultural University : कुलगुरूंसह शास्त्रज्ञांशी फलोत्पादन मंत्र्यांचा संवाद

स्वामी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करावयाचा आहे. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-दोन अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सूक्ष्म नियोजन करून कामे पूर्ण केली जातील.

World Toilet Day
National Council of Agricultural Research : ओडिशा मिलेट्स मिशनची सुरुवात

मोहीम कालावधीत यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरुस्ती करणे, मैला गाळ व्यवस्थापन अशाप्रकारे सुरू असणारी सर्व कामे पूर्ण केली जातील.’’

‘‘मोहिमेदरम्यान ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, एक शोषखड्डे असलेली शौचालय दोन शोषखड्डे शौचालयात रूपांतर केली जातील. याबाबत जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी नियोजनपूर्वक कामे करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ असेही स्वामी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com