Soybean Sowing : लातूर कृषी विभागात सोयाबीन क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढले

Kharif Season : कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत गेल्या दहा वर्षांत पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे.
Soybean Sowing
Soybean Sowing Agrowon
Published on: 
Updated on: 

Latur News : कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत गेल्या दहा वर्षांत पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. सोयाबीनचे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढले आहे. मात्र खरीप ज्वारी, मुगाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. दुसरीकडे तूर, कपाशीच्या क्षेत्रातही काही प्रमाणात घट झाली आहे. मका, भुईमूग पिके घेण्यास शेतकरी टाळत असल्याची स्थिती आहे.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत ४८ तालुके, २७५ महसूल मंडले व ११२ कृषी मंडले आहेत. या पाचही जिल्ह्यांतील ३५ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३१ लाख १ हजार हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. त्यापैकी २९ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र खरिपात पेरणी खाली येते. पाचही जिल्ह्यांत पावसाची सरासरी ८१३ मिलिमीटर आहे.

Soybean Sowing
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत; देशात मात्र दबाव!

प्रत्यक्षात गत दहा वर्षांतील २०१२-१३, १४-१५, १७-१८ व २०१८-१९ या वर्षात सरासरी पेक्षा कमी पाऊस तर २०१९-२० ते २०२२-२३ या वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

२०२२-२३ मध्ये लातूर जिल्ह्यात दोन वेळा मिळून १६ दिवस, धाराशिव जिल्ह्यात दोन वेळा मिळून २१ दिवस, नांदेड जिल्ह्यात दोन वेळा मिळून २० दिवस, परभणी जिल्ह्यात दोन वेळा मिळून २४ दिवस, तर हिंगोली जिल्ह्यात दोन वेळा मिळून २२ दिवस पावसाचा खंडही पडला.

२०११-१२ मध्ये खरिपात पाचही जिल्ह्यात २६ लाख ४ हजार हेक्टरवर पिके घेतली जायची. त्या क्षेत्रात जवळपास लाखभर हेक्टर क्षेत्राची वाढ होऊन २०२२-२३ मध्ये २७ लाख ६२ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.

Soybean Sowing
Soybean Stem fly Pest : सोयाबीन वरिल खोडमाशीला रोखण्यासाठी कोणती बीजप्रक्रिया कराल?

दहा वर्षांतील सोयाबीन क्षेत्रवाढीची कारणे...

- पावसाचा असमतोल, खंड, कधी जास्त, तर कधी अधिक पाऊस.

- ज्वारी, मूग, उडीद, तूर, कपाशी आदी पिकांचे अपेक्षित उत्पादन व दर मिळाले नाहीत.

- सोयाबीनसारख्या पिकात शेतकऱ्यांना जोखीम कमी वाटते.

- इतर पिकांच्या तुलनेत त्याचे दरही बरे वाटतात.

- सोयाबीन पीक काढणीनंतर त्याच क्षेत्रात रब्बीत दुसरे पीक घेता येते.

विविध पीक क्षेत्रात झालेले बदल (लाख हेक्टर)

पीक...२०११-१२...२०२२-२०२३

खरीप ज्वारी...३.९४...०.३४

तूर...३.७२...२.५६

मूग...१.१...०.६

उडीद...१.२४...०.७६

सोयाबीन...८.१६...१९.११

कपाशी...६.८२...४.०२

इतर पिके (मका, भुईमूग) १.४२...०.२३

मूग, उडदाच्या क्षेत्रात घट होण्याला पाऊस उशिरा येणे हे प्रमुख कारण ठरले आहे. याशिवाय वन्य प्राण्यांच्या त्रासापायीही शेतकऱ्यांनी सोयाबीन वगळता इतर पिकाच्या क्षेत्रात घट करणेच पसंत केल्याचे दिसते. शिवाय सोयाबीनला मूग, उडदाच्या तुलनेत उत्पादन व दरही बरे मिळतात. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत.
- साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com