Soybean Stem fly Pest : सोयाबीन वरिल खोडमाशीला रोखण्यासाठी कोणती बीजप्रक्रिया कराल?

Stem fly Pest : हंगामाच्या सुरुवातीपासूनच खोडमाशी च्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी.
Soybean Stemfly Pest
Soybean Stemfly PestAgrowon
Published on
Updated on

Soybean Seed Treatment : सोयाबीन हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल. मात्र बरेच शेतकरी बिजप्रक्रिया न करताच सोयाबीनची पेरणी करतात. सोयाबीनवर चक्रीभुंगा,पाने खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट आळी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होत असला तरी.

खोड माशी ()StemFly ही सोयाबीनवरील (Soybean) अतीशय नुकसानकारक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतोय. खोडमाशीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. विदर्भात गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.

त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच खोडमाशी च्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. तर ही बीजप्रक्रिया कशी करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.  

Soybean Stemfly Pest
Seed Treatment : रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती बीजप्रक्रिया करावी?

सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोप अवस्थेपासूनच म्हणजे रोप १० ते १५ दिवसाचे झाल्यानंतर होतो. त्यामुळे रोपाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिक दुबार पेरण्याची शक्यता असते. मात्र बीज प्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास २५ ते ३० दिवसापर्यंत या किडीला कमी प्रमाणात बळी पडतं. 

खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळतं.  मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही परंतु अशा रोपावर खोडमाशीच्या अळीचे प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.

खोडमाशीची अळी तसेच कोष पिकाच्या खोडामध्ये आणि फांद्यामध्ये असतो. अशा कीडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते . दाण्याचे वजन कमी होऊन सोयाबीन उत्पादनात १६ ते ३० टक्के घट होते. 

आता पाहुया बीजप्रक्रिया नेमकी कशी करायची ते  

सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्याला रासायनिक कीटकनाशक थायोमेथॉग्झाम ३० टक्के एफएस १० मिली याप्रमाणात चोळावं.  लक्षात ठेवा बीजप्रक्रिया करताना होतमोजे घालावेत.

या बीजप्रक्रियेमुळे सुरुवातीचे २५ ते ३० दिवस सोयाबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भापासून मुक्त राहतं.

बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी. 

अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यास सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. 

------------

रिपोर्ट - डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com