Kharif Season : धुळे जिल्ह्यात पेरण्या रखडत; पावसाची प्रतीक्षा

Kharif Sowing : आतापर्यंत एकूण ६० मिमीपेक्षाही कमी पाऊस झाला असताना १५ टक्के पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Dhule News : जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्याची प्रतीक्षा आहेच. आतापर्यंत एकूण ६० मिमीपेक्षाही कमी पाऊस झाला असताना १५ टक्के पेरणी झाली आहे. पेरणी रखडत सुरू असून, साक्री तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे आतापर्यंत ५ टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कपाशीची लागवड झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख ३५ हजार ९० हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ३३ हजार ८१५ हेक्टर म्हणजे ६० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

त्यात धुळे तालुक्यात ४८ हजार २५१ हजार, साक्री तालुक्यात ५ हजार ७९४, शिंदखेडा तालुक्यात १० हजार ४५० हेक्टर व शिरपूर तालुक्यात ३७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

Kharif Sowing
Solapur Sowing Update : पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा

जिल्ह्यात खरीप हंगामात चार लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत ६० हजार हेक्टर म्हणजे १५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरवर्षी जून अखेरपर्यंत ८० टक्के पेरणी होते. मात्र यंदा पावसाला आताशी सुरुवात झाल्याने पेरणीला विलंब झाला आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : चाकण परिसरात केवळ २० टक्केच पेरण्या

मागील हंगामात जूनअखेरीस धुळे तालुक्यात एक लाख ७ हजार ८०० हेक्टरपैकी ४९ हजार ६२३ हेक्टरवर, शिरपूर तालुक्यात एक लाख ५ हजार ३१८ पैकी ३७ हजार ९९७ हेक्टरवर, शिंदखेडा तालुक्यात ९९ हजार ७४४ पैकी ३७ हजार १७ हेक्टरवर आणि साक्रीत २२ टक्के म्हणजे एक लाख १ हजार ८५० पैकी २१ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पण यंदा एवढीदेखील पेरणी झालेली नाही.

आहे. जिल्ह्यात सर्वत्र, सर्वदूर सारख्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. तो वेगवेगळ्या भागात हजेरी लावत आहे. असमतोल स्थितीमुळे पावसाचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने त्या त्या भागात पेरणीचे प्रमाण वाढलेले असेल. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com