Rabi Sowing : रब्बीचे क्षेत्र पोहोचणार दीड लाख हेक्टरवर

यंदा रब्बीचे लागवड क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे गृहीत धरत एक लाख ५ हजार ५२० हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

अकोला ः जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या (Rabi Sowing) तयारीला सुरुवात झाली आहे. लवकरच रब्बी पेरण्यांना (Rabi Sowing) दिवाळीपूर्वी प्रारंभ होऊ शकतो. यंदा रब्बीचे लागवड क्षेत्र (Rabi Sowing Acreage) सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे गृहीत धरत एक लाख ५ हजार ५२० हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात रब्बीत हरभरा हेच प्रमुख पीक आहे. यंदा एक लाख १० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले.

Rabi Sowing
Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या घटत्या क्षेत्रावर चिंता

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात यंदा पोषक परिस्थिती आहे. जमिनीत ओलावा तसेच प्रकल्पांमध्येही सिंचनाच्या दृष्टीने साठा बनलेला आहे. पाणी पातळीसुद्धा सध्या चांगली आहे. यामुळे रब्बी पेरण्यांसाठी सर्व बाजूने योग्य स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीमध्ये साधारणपणे एक लाख २४ हजार २९१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यात सर्वाधिक ९० हजार हेक्टर हरभऱ्याखाली येत असते.

Rabi Sowing
Rabi Sowing : दोन लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

यंदा स्थिती लक्षात घेता हरभऱ्याचे लागवड क्षेत्र सुमारे २० हजार हेक्टरने वाढू शकते. रब्बीच्या पेरण्या पाहता यंत्रणांनी महाबीज व इतर कंपन्यांकडे बियाण्याची मागणी केलेली आहे. शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्याने बियाणे बदलाचे प्रमाण लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात २६ हजार टन खत शिल्लक

रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खताची गरज पाहता जिल्ह्यात सध्या २६ हजार ४७६ टन खतसाठा शिल्लक आहे. यात युरिया ८१३२, डीएपी ५५८, एमओपी ५१६, एसएसपी ८४७५, संयुक्त खते ८२२४, मिश्र खते ५१६ साठा शिल्लक आहे.

संभाव्य पेरणी क्षेत्र

हरभरा ११००००

गहू २६५००

कांदा व इतर १२०१५

रब्बी ज्वारी १०००

करडई ५००

मका ५००

एकूण १५०५२०

बियाणे मागणी

हरभरा २८८७५ क्विंटल

गहू २४६७५ क्विंटल

ज्वारी १०० क्विंटल

एकूण ५३७०३ क्विंटल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com