Jowar Sowing : अर्ध्याच क्षेत्रावर ज्वारीची पेरणी

नगर जिल्ह्यातील सर्वच भागात रब्बीत ज्वारीची पेरणी केली जाते. त्यातही जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत तालुक्यात क्षेत्र अधिक असते. पूर्वीपासूनच ज्वारी हे रब्बीतील प्रमुख पीक आहे.
Rabi Jowar
Rabi JowarAgrowon
Published on
Updated on

नगर ः जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी (Rabi Jowar) हे प्रमुख पीक आहे, मात्र ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होताना दिसत आहे. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत तर क्षेत्र कमी होत आहेच, पण यंदाच्या सरासरीच्या तुलनेतही यंदा सुमारे ४८ टक्के क्षेत्र यंदा कमी झाले आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत १ लाख ३९ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी (Jowar Sowing) झाली आहे. २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

Rabi Jowar
Jowar : कोणता देश जास्त ज्वारी पिकवतो?

नगर जिल्ह्यातील सर्वच भागात रब्बीत ज्वारीची पेरणी केली जाते. त्यातही जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत तालुक्यात क्षेत्र अधिक असते. पूर्वीपासूनच ज्वारी हे रब्बीतील प्रमुख पीक आहे. दहा वर्षापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टरवर ज्वारी पेरली जायची. मात्र पाच ते सहा वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र कमी होऊ लागले. दहा वर्षांची तुलना केली तर केवळ पंचवीस टक्के क्षेत्रावरच यंदा ज्वारी पेरली गेली आहे.

Rabi Jowar
Jowar : देशाची भूक भागवणारी ज्वारी मागे कशी पडली?

गतवर्षीप्रमाणेच यंदाही एन पेरणीच्या काळात परतीचा पाऊस पडल्याने पेरण्याला उशीर झाला. त्यामुळे क्षेत्र घट होत असल्याचे बोलले जात आहे. साधारण तीन वर्षांतील पेरणीचा अंदाज बांधून सरासरी क्षेत्र निश्चित केले जाते. त्यानुसार यंदा ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. ज्वारी पेरणीचा कालावधी संपून महिना उलटला आहे. त्यामुळे आता क्षेत्र वाढणार नाही. आतापर्यंत पेरणीबाबत कृषी विभागाकडे असलेल्या अहवालानुसार १ लाख ३९ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सरासरी क्षेत्राची तुलना करता केवळ ५२ टक्के क्षेत्रावर ज्वारी पेरली गेली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत कर्जतमध्ये ३० हजार, नगर तालुक्यात बारा हजार, श्रीगोंदा तालुक्यात वीस हजार, जामखेड तालुक्यात सहा हजार, शेवगाव तालुक्यात आठ हजार, नेवाशात सहा हजार हेक्टर क्षेत्रात घट झाली आहे.

तालुकानिहाय ज्वारीची पेरणी

(कंसात सरासरी क्षेत्र)

नगर २३१५२ (३५७७४),

पारनेर ३४१३१ (५४१३५),

श्रीगोंदा १०३५४ (३७२०२)

कर्जत २००७५ (५०१४३)

जामखेड ३१५०० (३७५९४)

शेवगाव १९६८ (९८३१)

पाथर्डी १२३९९ (२०५८६)

नेवासा १११८ (७४१७)

राहुरी ९४९ (३२५१)

संगमनेर १२०२ (५७१८)

अकोले ८२ (५.८)

कोपरगाव २४४ (१७१३)

श्रीरामपूर ६०३ (१०५१)

राहाता १४९४ (३४१०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com