Jowar : कोणता देश जास्त ज्वारी पिकवतो?

जगातीक पातळीवर ज्वारीचा वापर मानवी आहारासोबतच विविध कारणांसाठी केला जातो. मात्र जागतिक ज्वारी उत्पादनात मागील काही वर्षांपासून घट झाली आहे.
Jowar
Jowar Agrowon
Published on
Updated on


अनिल जाधव
पुणेः जगातीक पातळीवर ज्वारीचा वापर (Jowar Use) मानवी आहारासोबतच विविध कारणांसाठी केला जातो. मात्र जागतिक ज्वारी उत्पादनात मागील काही वर्षांपासून घट झाली आहे. आफ्रिका आणि आशियात ज्वारीचे उत्पादन जास्त होते. मात्र वापराचा विचार करता हे देश पिछाडीवर आहेत. 

Jowar
Jowar Market : महिनाभरात ज्वारी दरात मोठी तेजी का आली? | ॲग्रोवन

ज्वारीचं मूळ हे आफ्रिकेत सापडते. आफ्रिकेतून ज्वारी आशिया आणि नंतर भारतात पोचली. ज्वारी हे कमी पाण्यात येणारे पीक समजले जाते. इतर धान्य पिकांच्या तुलनेत ज्वारी हे जास्त दुष्काळ सहनशील धान्यपीक आहे. ज्वारीला उंट पीक म्हणूनही ओळखले जाते. ज्वारीला मक्याच्या तुलनेत खत आणि पाणी दोन्ही कमी लागते. ज्वारी हे विविध देशांमध्ये कमी पावसाच्या भागांमध्ये जास्त प्रमाणात घेतले जाते. पूर्वेकडील देशांमध्ये पशुखाद्यात ज्वारीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

Jowar
Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी लागवडीचे पंचसूत्री तंत्रज्ञान

धान्य पिकाचा विचार करता मका, तांदूळ, गहू आणि बार्लीनंतर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच धान्य पिकात ज्वारी पाचव्या क्रमांकावर येते. जगात जवळपास आफ्रिकेतील नायजेरिया, इथोपिया आणि सुदान तसेच चीन आणि भारतात ज्वारीचा जास्त वापर होतो. तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही मानवी आहारात ज्वारी वापरली जाते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते जगात आफ्रिकेतील देशांमध्ये ज्वारीचे जास्त उत्पादन होते. जागतिक पातळीवर मानवी आहार होणाऱ्या एकूण वापरापैकी जवळपास ४० टक्के वापर हा आफ्रिकेतील देशांमध्ये होतो.

जागतिक ज्वारी उत्पादनाचा आढावा घेतल्यास मागील पाच वर्षात उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले. २०१२ मध्ये जागतिक ज्वारी उत्पादन ७१७ लाख टनांवर होते. ते २०२१-२२ मध्ये ६१५ लाख टनांवर आले. जगातील एकूण ज्वारी लागवडीपैकी तब्बल ९० टक्के क्षेत्र हे विकसनशील देशांमध्ये आहे. त्यातही आफ्रिका आणि आशियात प्रामुख्याने ज्वारीची लागवड होते. आफ्रिका आणि आशियात मानवी आहारात ज्वारीचा जास्त वापर होतो. तर अमेरिका, चीन आणि इतर विकसित देशांमध्ये ज्वारीचा वापर हा पशुखाद्य आणि जैवइंधनासाठी होतो. मागील वर्षी अमेरिकेत सर्वाधिक ज्वारी उत्पादन झाले.

…………….
जागतिक ज्वारी उत्पादन
मागील हंगामात जागतिक पातळीवर ६५२ लाख टन ज्वारीचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ११४ लाख टन उत्पादन अमेरिकेने घेतले. तर नायजेरियात ६८ लाख टन उत्पादन झाले. इथोपियात ५२ लाख टन, सुदान ५० लाख टन आणि मक्सिकोत ४७ लाख टन तसेच भारतात  ४४ लाख टन ज्वारीचे उत्पादन झाले. जगातिक ज्वारी उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर आहे.

…………..
अमेरिकेचा वाटा जास्त
जगात अमेरिकेने मागील दोन वर्षांपासून नायजेरियाला उत्पादनात मागे टाकले. आता नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील हंगामात जगातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी तब्बाल १७.४८ टक्के ज्वारी उत्पादन अमेरिकेने घेतले. तर नायजेरियात १०.४२ टक्के उत्पादन झाले. अमेरिका आणि नायजेरिया या दोन्ही देशांमध्ये जगातिक उत्पादनाच्या जवळपास २८ टक्के उत्पादन होते.

 --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com