सांगली : सांगलीच्या दत्त इंडिया (Datta India Sugar Factory) या खासगी कारखान्याने एकरकमी २९६१ रुपये देण्याचे (Sugarcane FRP) जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊसदराची (Sugarcane Rate) कोंडी फोडली आहे. क्रांती, राजारामबापू, सोनहिरा, विश्वास, रविशंकर या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी (One Time FRP) जाहीर करावी, अन्यथा धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले, की शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी दिली होती. मात्र गेल्या वर्षीही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी नाही.
यंदाच्या गाळप हंगामात सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. दत्त इंडिया म्हणजे वसंतदादा कारखान्याने गत वर्षी २८५१ रुपये दर दिला होता. त्यात ११० रुपयांची वाढ केली असून, २९६१ एकरकमी दर जाहीर केला आहे.
सांगली जिल्ह्यात राजारामबापू कारखान्याचे सर्वोदय, साखराळे, वाटेगाव, आणि जत अशी चार युनिट आहेत. क्रांती, सोनहिरा, उदगिरी, हुतात्मा, विश्वास, निनाई, रविशंकर, मोहनराव शिंदे आदी १२ कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.
येत्या चार दिवसांचा अल्टिमेट आम्ही कारखानदारांना देत आहोत. अन्यथा, शनिवार (ता. ५) पासून जिल्ह्यात ऊस तोडी बंद, गाड्या अडवणे सुरू करण्याचा इशारा देत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा परिणामास सामोरे जावे, असा इशारा खराडेनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.