Solapur Nagpur Highway : सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद ?

सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड येथील प्रवाशांना नागपूरला जाण्यासाठी सोलापूर-नागपूर ही एकमेव द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस होती. मात्र, कोरोना संकटापासून बंद असलेली ही गाडी अद्याप बंदच आहे.
Nashik Pune Highway
Nashik Pune HighwayAgrowon
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड येथील प्रवाशांना नागपूरला जाण्यासाठी सोलापूर-नागपूर ही एकमेव द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस होती. मात्र, कोरोना संकटापासून (Corona Disease) बंद असलेली ही गाडी अद्याप बंदच आहे. त्यामुळे सोलापूर- नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ (Maharashtra Express) पकडून नागपूर गाठावे लागत आहे.

Nashik Pune Highway
Crop Harvesting : सुगीच्या कामामुळे दिवाळीतही शेतकऱ्यांना नाही उसंत

सोलापूरकरांना नागपूरला जाण्यासाठी एक तरी गाडी असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार सोलापूर रेल्वे विभागाने उन्हाळ्याच्या विशेष हंगामात सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस सुरू केली. ती काही महिने धावली. त्यानंतर गाडीस पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. दिलेल्या मुदतवाढीनंतर सोलापूर- नागपूर एक्स्प्रेस थांबली. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गाडीस प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभला. सोलापूरकरांसाठी महत्त्वाची असलेली ही गाडी नियमित झाली तर नागपूरला जाण्यासाठी सोलापूरकरांची चांगली सोय होईल. दर रविवारी ०२१११ ही गाडी सोलापूर स्थानकावरून सायंकाळी आठ वाजता निघून दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १.३० वाजता नागपूरला पोचत होती.

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस ही द्वि-साप्ताहिक होती. त्यामुळे या गाडीला प्रवाशांची संख्या मोठी असायची. सोलापूरकर प्रवाशांना थेट नागपूरला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने त्यांना एसटी आणि खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. याला वेळ अन्‌ अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर लहान व्यावसायिक रेल्वेमध्ये खाद्यपदार्थांसह अन्य साहित्य विकायचे. मात्र, गाडी बंद असल्याने अनेकांचा व्यवसाय बंद झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com