Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यांनी बांधली तृणधान्याची राखी

Rakshabandhan : महाराष्ट्रचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यानी बांधली यावेळी त्यांना बांधलेल्या राखीमुळे ते भारावून गेले.
Hasan Mushrif
Hasan Mushrif agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : महाराष्ट्रचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यानी बांधली यावेळी त्यांना बांधलेल्या राखीमुळे ते भारावून गेले.

दरम्यान मंत्री मुश्रीफ यांना बांधलेल्या राखीतून सामाजीक संदेश देण्यात आला आहे. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी मुश्रीफ यांना तृणधान्यापासून तयार करण्यात आलेली राखी बांधली.

राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागलच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत तृणधान्याच्या पोषण तत्वांचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, भारतीय आहार पद्धतीमध्ये तृणधान्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तृणधान्यांमध्ये असलेल्या उच्च पोषण तत्त्वांमुळे बालपणापासूनच आहारात तृणधान्यांचा समावेश असावा.

Hasan Mushrif
Hasan Mushrif : तर गोकुळमध्येही क्लीन चिट मिळेल, हसन मुश्रीफांचा विश्वास

राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत अभियानाचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, सुपरवायझर सुमित्रा कोरवी, पिंपळगाव खुर्द सरपंच शितल नवाळे, अंगणवाडी सेविका अंजना आकुर्डे, संगीता पोवार, सुजाता मोरे, गीतांजली पाटील, समाजिक कार्यकर्ते अमोल नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तृणधान्याचा फराळ

यावेळी फराळ म्हणून पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडी सेविकांनी तृणधान्यापासून बनवलेली चिक्की, लाडू, पापड असे अनेक पदार्थ आणले होते. मंत्री मुश्रीफ या फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com