Hasan Mushrif : तर गोकुळमध्येही क्लीन चिट मिळेल, हसन मुश्रीफांचा विश्वास

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्येही क्लीन चिट मिळेल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Hasan Mushrif
Hasan Mushrifagrowon
Published on
Updated on

Kolhapur Gokul Milk : मागच्या दोन दिवसांपूर्वी सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. तसेच त्यांना राज्य बँकेतकडूनही दिलासा देण्यात आला. यावरून हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्येही क्लीन चिट मिळेल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली.

राज्य बँकेतील सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. तसेच गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणातूनही काहीही निघणार नाही. त्यातूनही जरी काही निघाले तरी त्यातही क्लीन चिट मिळेल'. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य बँक व सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे भाजपला आव्हान दिले आहे.

यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'या दोन्ही प्रकरणांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये क्लीन चिट देण्यात आली असल्याने चौकशीचा काही प्रश्नच उद्भवत नाही. याच पध्दतीने गोकुळमध्येही काही होणार नाही. मुळात लेखापरीक्षणाची काहीच गरज नाही. तरीही लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यातून काही निघाले तरी गोकुळला क्लीन चिट मिळेल.'

ते पुढे म्हणाले की, 'राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने धोरण ठरवले आहे की, ज्या ठिकाणी शरद पवार यांची सभा झाली, त्या ठिकाणी सभा घेवून उत्तर द्यायचे नाही. त्यामुळे टीकाटिप्पणीपेक्षा जिल्ह्यातील प्रश्नांना १० सप्टेंबरच्या सभेत महत्व असेल.

Hasan Mushrif
Gokul Milk Kolhapur : गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का! लेखापरीक्षण होणार? उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी साडेनऊ वर्षात सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यामुळे विरोधातील मंडळी एकत्र येवून लढण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत सत्ताधारी, विरोधक असणार आहेत. त्यांच्या परीने ते प्रयत्न करत आहेत. मात्र भाजपविरोधात त्यांना यश मिळणार नाही.

'दरम्यान, 'भाजपची शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीसोबत झालेली आघाडी आवडली नसल्याचे मत मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केले आहे. मुनगंटीवार यांनी हे बोलण्यापूर्वी मोदी-शहा अशी युती करण्यासाठी का प्रयत्न करत आहेत, याचा विचार करावा', असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com