कापूस पिकाची लागवड करताना काय खबरदारी घ्यावी ?

पेरणी (Sowing) योग्य पाऊस झालेल्या भागात वाफसा झाल्यानंतर कपाशीची लागवड (Cotton Sowing) सुरू झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व (Pre-Monsoon) कपाशीची लागवड केली आहे.
Cotton Sowing Tips
Cotton Sowing TipsAgrowon

राज्यात अजूनही बऱ्याच भागात पावसाने (Rain) मनसोक्त हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यभर मॉन्सून (Monsoon) पोहचला असला तरी जून अखेरीसही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र काही भागात पेरणी योग्य पाऊस झालाय. त्यामुळे राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. (Cotton Sowing Tips)

पेरणी योग्य पाऊस झालेल्या भागात वाफसा झाल्यानंतर कपाशीची लागवड सुरू झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व पावसावर कपाशीची लागवड केली आहे. मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड झालेल्या भागात तणांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर ज्या भागात जोरदार पाऊस पडलेला नाही अशा भागात जमिनीची तयारी तर काही ठिकाणी लागवड सुरू आहे.

कपाशाच्या लागवडीनंतर साधारणतः ८० दिवसापर्यंत कपाशीची उगवण होऊन हळूहळू कपाशीचे रोप, फुलोरा आणि बोंड तयार होते. मात्र ही वाढ होताना कपाशीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मात्र हे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे. मात्र शेवटी नुकसान ते नुकसान असतं. त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्यासाठी नागपूरमधील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पीक व्यवस्थापनासाठी सल्ला दिला आहे.

बिजप्रक्रिया कशी करावी तर अजूनही ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी कपाशीवर पडणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी बियाण्याची बीजप्रकिया करावी. बीजप्रक्रियेसाठी काय वापरायचं तर मूळसड आणि जिवाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के डी.एस. ३.५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यांना चोळावे.

कुठल्याही पिकांत तण उगवलं तर उत्पादनात घट होते. कपाशीच्या लागवडी पूर्वी उगवणारं तण ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी असते. पेरणीपूर्वी उगवलेल्या तणाच्या नियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन (३८.७ टक्के सी.एस.) ७०० मि.लि. प्रति एकर फवारणी करावी.

तर पेरणीनंतर उगवलेल्या तणाच्या नियंत्रणासाठी पायरीथिओबॅक सोडीअम (१० टक्के इसी) १२. ५ ते १५ मिली प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारावं. शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी अचूकपणे वापरावीत.

तणनाशकाची शिफारशीपेक्षा कमी मात्रा दिल्यास तणांचे नियंत्रण कमी प्रमाणात होते. आणि अधिक मात्रा वापरल्यास पिकांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अचूक मात्रेत वापर केल्यास पीक व्यवस्थापनास मदत होते. शेतकरी बऱ्याचदा मुदत संपलेली तणनाशकांचा फवारणी करतात. त्यामुळे मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. फवारणीनंतर तणांच्या प्रादुर्भावानुसार खुरपणी आणि कोळपणी करावी.

तणनाशकांबरोबरच खतव्यवस्थापनसुद्धा कपशीसाठी महत्त्वाचं असतं. बागायती कपाशीला पेरणीच्या वेळी खतांचा डोस दिला नसेल तर ३० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश रिंग पद्धतीने किंवा छिद्र पाडून मुळाजवळ द्यावा. जेणेकरून खतांचा वापर अचूक पद्धतीनं होईल.

आपल्याकडे बरेच शेतकरी कपाशीमध्ये आंतरपिक घेतात. मात्र त्यासाठी अंतरपिकातील कुठल्या पद्धतीचा वापर करावा. तर कापूस आणि मूग आंतरपीक म्हणून घेणार असाल तर एक ओळ कापसाची आणि दोन ओळी मूगाच्या किंवा कापूस आणि उडदाची पेरणी करणार असाल तर एक ओळ कापूस आणि एक ओळ उडीद याप्रमाणे पेरणी करावी. कापूस आणि सोयाबीन असेल तर एक ओळ कापसू आणि एक ओळ सोयाबीन या पद्धतीनं आंतरपीक घ्यावे.

पिकांवर पडणाऱ्या किडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे कीडनियंत्रण महत्त्वाची असते. कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्राथमिक स्तरावरील नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडुलिंबावर आधारित कीडनाशक ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास प्रोफेनोफॉस (५० ईसी) ३० मिली किंवा एमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी, फुलकिडे आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी ८ ते १० याप्रमाणे लावावेत. एकरी २ फेरोमन सापळे लावावेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com