Sharad Pawar : ...हे शहाणपणाचे लक्षण नाही

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे हे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. आता तेच आरोप करत आहेत, हे शहाणपणाचे लक्षण नाही
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

पुणे ः उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या सरकारमध्ये उदय सामंत (Uday Samant) आणि एकनाथ शिंदे (eknath Shinde) हे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. आता तेच आरोप करत आहेत, हे शहाणपणाचे लक्षण नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्र्यांचे कान टोचले.

श्री. पवार यांची पुणे येथे गुरुवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘हा वेदांतचा प्रकल्प तळेगावमध्ये येणार होता. त्याची तयारी झाली होती. महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला तर त्यावर चर्चा नको. या प्रकल्पामध्ये पंतप्रधान लक्ष घालत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. पण यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढावी असे आहे.’’

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतीवरील भार कमी करावा लागेल ः पवार

‘‘या देशातील महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीत करायचा निर्णय झाला होता. तोही वेदांत ग्रुपचा होता. नंतर तो प्रकल्प चेन्नईला नेला. ही जुनी गोष्ट आहे. त्यामुळे वेदांत ग्रुपकडून ही पहिलीच गोष्ट झालेली नाही. वेदांतचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल की नाही याची खात्री नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी घेतली.

Sharad Pawar
Ajit Pawar : पशुधनावरील गंभीर धोका दूर करा ः अजित पवार

आतापर्यंत कुणालाही गुंतवणूक करायची असेल तर त्यात महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर कर्नाटक, गुजरात असायचा. नेहमी महाराष्ट्र नंबर वन होता. कारण महाराष्ट्राची लीडरशिप अशा सर्व कामांना प्रोत्साहित करायची. गुंतवणुकीसाठी एक चांगले वातावरण राज्याला निर्माण करावे लागते. आता त्यामध्ये लोकांचे लक्ष आहे की नाही, या बाबत पवार यांनी शंका व्यक्त केली.

‘वातावरण सुधारण्याकडे लक्ष द्या’

‘‘दोन्ही बाजूंनी दूषणे द्यायचे, वाद करायचे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण कसे सुधारेल, विकासाच्या दृष्टीने कसे पुढे जाऊ, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. टीका करा. दोष देत बसू नका. नवीन प्रकल्प कसे येतील यावर लक्ष केंद्रित करा,’’ असा सल्ला श्री. पवार यांनी दिला.

नवीन सरकारचा मला अजून कारभार दिसला नाही, पण गतिमान राज्य आहे, हे दिसतेय. कारण राज्याचे प्रमुख अधिक गतीने धावत आहेत आणि राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय दुसरे काही दिसले नाही.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com