Sharad Pawar : शेतीवरील भार कमी करावा लागेल ः पवार

देशात अद्यापही ६० टक्के वर्ग शेतीवर अवलंबून राहिल्यामुळे न सोसवणारा भार निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे तंत्रज्ञानयुक्त उत्तम शेती करतानाच शेतीवरील बोजादेखील कमी करावा लागेल,’’ असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

पुणे ः ‘‘देशात अद्यापही ६० टक्के वर्ग शेतीवर अवलंबून (Dependency On Agriculture) राहिल्यामुळे न सोसवणारा भार निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे तंत्रज्ञानयुक्त (Agriculture Technology) उत्तम शेती करतानाच शेतीवरील बोजादेखील (Burden On Agriculture) कमी करावा लागेल,’’ असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

Sharad Pawar
Grapes : द्राक्ष बागेत रोगनियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने आयोजिलेल्या तीनदिवसीय द्राक्ष परिषदेचे उद्‍घाटन रविवारी (ता.२८) पुण्यातील टीपटॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे झाले. या वेळी बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कृषी आयुक्त धीरज कुमार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सल्लागार डॉ. एस. जैन, अखिल भारतीय फलोत्पादन महासंघाचे अध्यक्ष सोपान कांचन, बागाईतदार संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, खजिनदार सुनील पवार, संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. जी. एस. प्रकाश जैन, ‘अपेडा’चे डॉ. लोकेश गौतम, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर, कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, माजी कुलगुरू शंकरराव मगर, जे. एस. प्रकाश, जयराम खिलारी, डॉ. एस. डी. सावंत, हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी उपस्थित होते.

‘द्राक्ष संघाचे काम आगळेवेगळे’

परिषदेला विदेशी शास्त्रज्ञ अॅन्ड्रियास थिसेन, डॉ. लिडिया उगेना, अॅन्टिपस क्रायडोर, डॉ. डेव्ह पिंक्सटेरॉन, डॉ. डगलस मरीन उपस्थित होते. द्राक्ष बागाईतदार संघाच्या वाटचालीचे पवार यांनी तोंडभरून कौतुक केले. “बारामती व फलटण भागांत प्रयोग करणाऱ्या बाबासाहेब शेंबेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला व संघाची स्थापना १९६० मध्ये केली. प्रत्येक पिकांमधील उत्पादकांच्या संघटना देशात तयार व्हाव्यात, यासाठी मी प्रयत्न केला. आंबा, केळी, डाळिंब अशा प्रत्येक फळांच्या संघटना झाल्या. मात्र, द्राक्ष संघासारखे उत्तम व तंत्रशुद्ध काम इतर कोणत्याही संघाला करता आले नाही. तुम्ही सतत नवीन आव्हानांना सामोरे जातात. विविध उपक्रम राबवतात. त्यामुळे देशात शेतीविषयक कार्यरत संस्थांमध्ये द्राक्ष संघाचे काम आगळेवेगळे आहे,” असे पवार म्हणाले.

Sharad Pawar
Grape : अतिवृष्टीचा द्राक्षबागांवर परिणाम

‘आता पेटंटेड वाण हवेत’

शिवाजीराव पवार म्हणाले, “गेल्या दोन हंगामांत आर्थिक फटका बसूनही बागायतदार खंबीरपणे पुढे सरकत आहेत. त्यांना आता पेटेंटेड वाण हवे आहे. द्राक्ष व बेदाणा निर्यातीमधील अडथळे दूर व्हावेत. निविष्ठांच्या अनियंत्रित दरवाढीवर मर्यादा हवी. तसेच निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांवर कृषी विभागाने नियंत्रण आणावे. संजीवकांच्या आयातीमधील अडथळे हटवावेत. तसेच, स्थानिक बाजारपेठांसह व निर्यातसाखळी बळकट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करायला हवी.”

‘द्राक्ष उत्पादकांचा अभिमान’

“देशाच्या कृषी व्यवस्थेला वेगळे वळण शरद पवार यांनी दिले. तर देशातील फलोत्पादनात द्राक्ष उत्पादकांनी आदर्श काम केले. या कामाचा आम्हाला खूप अभिमान आहे,” असे गौरवोद्‍गार कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी काढले. निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील ९८ टक्के शेतकरी महाराष्ट्राचे आहेत. निर्यातीत त्यात सर्वांत जास्त वाटा आपल्या राज्याचा आहे. गेल्या वर्षी झालेली निर्यात अडीच हजार कोटींची आहे,’’ असे आयुक्त म्हणाले.

हेक्टरी २.४० लाखाचे अनुदान

‘राज्यात ‘रोहयो’तून फळबाग लागवड योजनेत द्राक्षाचा समावेश केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हेक्टरी २.४० लाख रुपये अनुदान मिळेल. १२ द्राक्ष आच्छादनासाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. अर्ली छाटणीच्या बागांना फळपीक विमा योजना मिळेल. नाशिकमध्ये १०० कोटींची द्राक्ष क्लस्टर योजना तयार केली आहे. स्मार्ट योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांना ३५० कोटीचे अनुदान मिळेल,’’ असे कृषी आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

‘तुम्ही कष्टकरी अन् विज्ञानवादीही’

“द्राक्ष बागाईतदार संघाच्या नेतृत्वाखाली काम करणारे शेतकरी शेतीमधील परिवर्तनाचा स्वीकार करीत असतात. कष्टकरी आहात; पण विज्ञानवादीदेखील आहात. असाच लौकिक टिकवून ठेवा. उत्तम शेती करा. नवे तंत्रज्ञान स्वीकारा,” असा सल्ला शरद पवार यांनी या वेळी दिला. संघाच्या ६२ वर्षांच्या वार्षिक अधिवेशनाच्या वाटचालीत ५० अधिवेशनाची उद्‍घाटने पवार यांनी केली आहेत. ते संघाचे आधारवड आहेत, अशा शब्दांत संघाने पवार यांचा गौरव केला. या वेळी उपस्थितीत शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत आनंद व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com