
Latur Earthquake : आजचा दिवस एकप्रकारे अस्वस्थ करणारा दिवस आहे. मुख्यमंत्री पदावर काम करताना अनेक कामे असतात. त्यातलं काम म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातील शेवटचा गणपतीचे विसर्जन झाल्याशिवाय विश्रांती घेता येत नाही. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास झोपायला गेलो आणि अंग टाकतोय, तोच घराच्या खिडक्या हलल्या, सामान हलले. तेव्हा माझ्या लक्षात आले. हे भूंकपाशिवाय शक्य नाही. सकाळी 6 वाजता मी विमानाने लातूर आलो. किल्लारी गावात पोहोचलो तर भयानक परिस्थिती होती, घरं पडली, प्रेत पडली, काही लोक कणतायंत, कुणी रडतयं, आया-बहिणी अस्वस्थ... आयुष्यात असं संकट पाहून नये, अशी स्थिती, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी जागवल्या.
लातूर-उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील किल्लारी - सास्तूर परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला. या घटनेला आज ३० वर्षे झाली. यानिमित्ताने भूकंपग्रस्तांच्यावतीने किल्लारीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार यांनी किल्लारी भूकंपात प्राण गमावलेल्या मृतांना स्मृतिस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी क्रिडा मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
किल्लारीत पोहोचल्यानंतर लक्षात आलं की या परिसरातील गावांमध्ये झालेला भूकंप हे मानव निर्मिती संकट नव्हतं. या निसर्ग निर्मित संकटामुळे प्रचंड नुकसान झाले. या संकटग्रस्त माणसांच्या मागे सत्ता आणि सरकार उभा केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही दोन-तीन तासात पुनवर्सनाची प्रक्रिया सुरू केले. पण काम करत असताना सर्व सामान्य जनतेनं मोठ्या धैर्याने संकटाला तोंड देण्याचं एेतिहासिक काम केले. त्यामुळेच आम्ही त्यांना आधार देण्याचे काम करू शकलो. त्याची जगभर चर्चा झाली. मला युनो आणि जागतिक बॅंक बोलावले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनीही पुनवर्सनाच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांची रक्कम १० दिवसा उभी केली. तसेच मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था आणि लोक पुढे त्यातून हे काम उभे राहू शकले, अशा अनेक घटना शरद पवारांनी उघडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.