Swapnil Shinde
३० सप्टेंबर १९९३ रोजी गणेश विसर्जनाच्या रात्री पहाटे ३:५५ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्हा हादरला.
या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर किल्लारी - सास्तूर (जि. लातूर) परिसर होते.
या भूकंपाचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना सर्वात जास्त फटका बसला. त्यात एकूण ५२ गावे उध्वस्त झाली.
रिश्टर स्केलवर ६.५ पातळीवर मोजल्या गेलेल्या या भूकंपात अंदाजे १०,००० लोक मृत्यूमुखी पडले तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले व ५३,००० घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
भूकंपामुळे घरे पडून झालेले माती दगडाचे ढिगारे आणि त्यात धो धो कोसळणारा पाऊस यामुळे दुसऱ्या दिवशी परिस्थिती खूप बिकट झाली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले.
लोकांच्या मदतीला लष्कराला पाचारण करण्यात आले. संध्याकाळपर्यंत लष्कराची शेकडो वाहने किल्लारी परिसरात दाखल झाली होती.
भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूकंपानंतर २४ व्या दिवशी पाच गावांतील घरांच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. त्या मदत व पुनर्वसन कामाची जगाने नोंद घेतली.