Drought Condition : सलगर बुद्रुक परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती

Monsoon Rain : चालू मॉन्सून हंगामातील पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. एकाही नक्षत्रकाळात पाऊस पडला नाही. खरीप हंगाम शंभर टक्के वाया गेला आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Drought News : चालू मॉन्सून हंगामातील पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. एकाही नक्षत्रकाळात पाऊस पडला नाही. खरीप हंगाम शंभर टक्के वाया गेला आहे. शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

जनावरांना चारा मिळणे मुश्कील झाले आहे. एकंदरीतच, मॉन्सूनच्या सुरवातीच्या टप्प्यातच सलगर बुद्रूक परिसरातील सलगर खुर्द, जंगलगी, चिक्कलगी, बावची, मारोळी, लवंगी, आसबेवाडी, पोट, येळगी, शिवणगी, सोड्डी या दक्षिण मंगळवेढ्यातील गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीला जनतेला तोंड द्यावे लागत आहे.

विविध कारणांनी सलगर बुद्रूक परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने इथला कष्टकरी, शेतकरी, सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. या घटकांना धीर देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आवताडेंनी गावभेट दौरा केला आहे.

Sugarcane
Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्यापही २७ टक्के क्षेत्र पेरणीविना

वेगवेगळ्या समस्यांवर लवकरात लवकर मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. जनता पावसाची वाट पाहात आहे. तसेच शासकीय मदतीसाठी लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशेने बघत आहे.

Sugarcane
Kharif Sowing : बुलडाणा जिल्ह्यात पेरण्यांना वेग

पिण्यासाठी विकतचे पाणी

पावसाअभावी सर्वच जलस्रोत कोरडे आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना व गावात राहणाऱ्या नागरिकांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सलगर बुद्रूक परिसरातील गावांमध्ये चाऱ्याचे मोठे दुर्भिक्ष झाले आहे.

शेतीला पाणी नसल्याकारणाने चारावर्गीय पिके घेता येत नाहीत. त्यामुळे दुभत्या जनावरांना पंढरपूर व दूर कर्नाटकातील उसाचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना एका टनाला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com