Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्यापही २७ टक्के क्षेत्र पेरणीविना

Latest Kharif Sowing News : जुलैचा अर्धा महिना ओलांडण्याची वेळ आली तरी पेरण्या बाकीच आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७३ टक्के पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील सर्वसाधारण ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ५३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अजूनही जवळपास १ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी बाकी असल्याची स्थिती आहे.

जुलैचा अर्धा महिना ओलांडण्याची वेळ आली तरी पेरण्या बाकीच आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७३ टक्के पेरणी झाली आहे. ९ जून ते १० जुलै २०२३ या कालावधीत एकूण १३६.५ मिलिमीटर म्हणजेच ७८.४ टक्के पाऊस पडला आहे. मात्र पेरणीयोग्य झाला नसल्याने अजूनही पेरण्या बाकी आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : मराठवाड्यात १९ लाख हेक्टर पेरणीविना

पीकनिहाय स्थिती अशी...

कपाशी ः जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९४ हजार ७७१ हेक्टर. त्यापैकी २ लाख ६३ हजार ८८७ हेक्टरवर लागवड झाली. ती सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ६६.८५ टक्के आहे. पीक उगवणी व वाढीच्या अवस्थेत.

ज्वारी ः जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १३४३.६ हेक्‍टर. २७६ हेक्टरवर पेरणी. ती सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ २०.५४ टक्के. पीक उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत.

Kharif Sowing
kharif Sowing : पावसाच्या दडीनं दुबार पेरणीचं संकट?

बाजरी ः सरासरी क्षेत्र ३१ हजार ९०४ हेक्टर. १० हजार ५७१ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत ३३.१३ टक्के.

मका : सरासरी क्षेत्र १ लाख ७७ हजार २८७ हेक्टर. १ लाख २८ हजार १९३ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत ७२.३१ टक्के.

तूर : सरासरी क्षेत्र ३५ हजार ७०० हेक्टर. १६,१३४ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत ४५.१९ टक्के

मूग : सरासरी क्षेत्र १३८२५ हेक्टर. ५ हजार १८५ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत ३७.५ टक्के.

उडीद ः सरासरी क्षेत्र ५३८४ हेक्टर. १५०७ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या २८ टक्के

भुईमूग : सरासरी क्षेत्र ६ हजार ६०४ हेक्टर. ३१४२ हेक्टरवर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत ४७.५७ टक्के.

सोयाबीन : सरासरी क्षेत्र १४,४२४ हेक्टर. १४ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी. ती सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com