Milk Adulteration : दूध भेसळीचा अहवाल २४ तासांत पाठवा

Dairy Industry : राज्यात दूध भेसळीचा प्रकार आढळून येताच २४ तासांच्या आत प्राथमिक चौकशी अहवाल पाठवा, असे आदेश दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयाने दिले आहेत.
Milk Adulteration
Milk AdulterationAgrowon
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यात दूध भेसळीचा प्रकार आढळून येताच २४ तासांच्या आत प्राथमिक चौकशी अहवाल पाठवा, असे आदेश दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयाने दिले आहेत.

दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाय करण्यास विद्यमान दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली आहे. राज्यातील डेअरी उद्योगात सहकारी दूध संघांचा मोठा वाटा आहे.

या संघांच्या समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सतत आघाडीवर असतो. या पक्षाचे नेते अजित पवार यांनीही काही महिन्यांपूर्वी दूध भेसळीच्या मुद्द्यावर सडकून टीका केली होती. आता ते स्वतः उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. त्यामुळे भेसळखोरी विरोधातील कारवाई मोहीम मोडीत निघणार नाही, असा दुग्धव्यवसाय विकास विभागातील अधिकाऱ्यांचा कयास आहे.

Milk Adulteration
Adulterated Milk : दुधातील भेसळ रोखण्यासाठी शासन कठोर पावले उचलतंय

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयाने दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. यापूर्वी घोषित केलेल्या जिल्हास्तरीय समित्या कार्यरत होण्यासाठी हालचारी चालू केल्या आहेत.

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्याने आपल्या भागातील भेसळीच्या घटनेचा अहवाल तत्काळ पाठवावा. त्यामुळे राज्य शासनाला माहिती पाठवता येईल. त्यानंतर सविस्तर अहवाल पुढील दोन दिवसांच्या आत पाठवावा.

Milk Adulteration
Milk Adulteration : दूधातली भेसळ कशी ओळखायची?

दूध भेसळीसंबंधी अहवाल पाठविण्यास विलंब झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास विभागातील गुणनियंत्रण कक्षाच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.

भेसळीला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वैधमापन शास्त्र उपनियंत्रक या समितीत सदस्य आहेत. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.