Adulterated Milk : दुधातील भेसळ रोखण्यासाठी शासन कठोर पावले उचलतंय

Minister Radhakrishna Vikhe-Patil : राज्यात दूध भेसळीचा प्रकार गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे तपासणी होत नाही.
Adulterated Milk
Adulterated MilkAgrowon
Published on
Updated on

Nagar Milk News : राज्यात दूध भेसळीचा प्रकार गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत त्यामुळे तपासणी होत नाही. त्यामुळे ‘आरे’मधील कर्मचारी अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

दूध भेसळ रोखण्याशिवाय पर्याय नाही. शासन कठोर पावले उचलते आहे. पुढील आठवड्यात राज्यातील दूध संघाची बैठक घेणार आहोत, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

नगर येथे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘राज्यात दूध भेसळीबाबत परिस्थिती गंभीर आहे. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरात भेसळीचे कारखाने असल्याची सरकारकडे माहिती आहे. नगर जिल्ह्यात मागील काळात श्रीगोंद्यात भेसळ पकडली.

पारनेरला सर्वाधिक दूध भेसळ होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात ६० हजार लिटर दूध भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. दुधाची भेसळ हे खासगी दूधसंघ वाले स्वीकारतात. भेसळीच्या दुधापासून प्रक्रिया करतात.

Adulterated Milk
Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करणार

सर्वसामान्यांच्या जीवनाशी हे भेसळखोर खेळ करत आहेत. दुधासाठी लागणारे पशुखाद्य याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवले आहेत. मुळात अनेक पशुखाद्य उत्पादक त्या खाद्याविषयीची सखोल माहिती पाकिटावर छापत नाहीत अशा कंपन्यांवरही राज्य शासन कारवाई करणार आहे.

दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून, पुढील आठवड्यात राज्यातील दूध संघाची बैठक घेणार आहोत. दूध भेसळ रोखण्याच्या तपासणीसाठी ‘आरे’चे कर्मचारी अन्न औषधकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे.

अन्न औषध प्रशासन भ्रष्टाचारी

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘नगर जिल्ह्यासह राज्यातच अन्न व औषध प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहे. दूध भेसळसह अनेक बाबी तपासण्याची या विभागावर जबाबदारी आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. मात्र जे आहेत ते कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळण्याचे काम करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

शेवगावसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा गुटखा सापडतो, मग अन्न भेसळल्याने किती कारवाई केल्या, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. ही भ्रष्टाचाराची मोडून काढण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com