Team Agrowon
राज्यात दूधाच्या मागणीच्या तुलनेत दूध उत्पादन अगदी कमी आहे. ही तफावत कमी करण्यासाठी मोठ्य प्रमाणात दूध भेसळीच्या घटना घडत असतात.
भेसळयुक्त दुधामुळे दूध दर वाढ होण्यात नसल्याने दुग्धव्यवसायिकांना त्याचा फटका बसत आहे.
या भेसळयुक्त दूधामुळे लोकांच्या आरोग्य परिमाण होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने दूध भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भेसळ ओळखणे
भेसळयुक्त दूध फक्त नजरेने, वासाने किंवा चवीने ओळखू शकत नाही. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही भेसळ ओखळू शकता.
दूध शुद्ध असेल, तर त्याचे थेंब ओघळून मागे डाग राहतात. मात्र दुधात भेसळ असेल, तर त्याचे काहीच डाग राहत नाहीत.
दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासलं असता, त्यातून फेस तयार होतो. याचाच अर्थ दूध भेसळयुक्त आहे.
भेसळ ओखळण्यासाठी रासायनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यातूनच भेसळ ओळखता येते.