Paisewari : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

सुधारित पैसेवारी ४७; अतिवृष्टीसह सततच्या पावसाने शेतकरी अडचणीत
 Paisewari
PaisewariAgrowon
Published on
Updated on

यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सुधारित पैसेवारी (Paisewari) ४७ निघाल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता अंतिम पैसेवारी येत्या ३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. सुधारित पैसेवारीतच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अंतिम पैसेवारीही प्रशासनाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे.

 Paisewari
Crop Insurance : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

गेल्या जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. असे असले तरी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५३ आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेलकी नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती. नजरअंदाज पैसेवारी ५०च्यावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होता. सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. प्रशासनाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मान्य करीत पैसेवारी ४७ काढली होती. यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांपर्यंत पाऊस बरसला. त्यांचा पिकांना फटका बसला. पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने आगमन झाल्याने शेतकरी व पीक अडचणीत सापडले होते. त्यांचा परिणाम उत्पन्नावर झाला.

 Paisewari
PDKV, Akola : ‘पंदेकृवि’ च्या कुलगुरू निवडीकडे सर्वांच्या नजरा

कापूस, सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. यानंतर आता तूर पीकही अडचणीत आले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात घट झाली. अशातच सुधारित पैसेवारी ४७ आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित पैसेवारी ५०च्या आत आल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाला आहे, असे असले तरी प्रशासनाच्या दृष्टीने अंतिम पैसवारी महत्त्वाची आहे. सुधारित पैसेवारी ४७ असल्याने अंतिम पैसेवारी ही ५०च्या आत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतिम पैसेवारी काढण्याचे काम सुरू झाले आहे. सध्याची पिकांची स्थिती पाहता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची स्थिती अडचणीची असल्यानंतरही गेल्या काही दिवसांपूर्वी वीजबिलाची वसुली मोहीम महावितरणने सुरू केली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. ओरड झाल्यानंतर महावितरणने वसुली मोहीम स्थगित केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम पैसेवारीकडे लागल्या आहेत. सुधारित वरच बहुतांशवेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात फारसा बदल होत नसल्याने अंतिम पैसेवारी शेतकऱ्यांना दिलासा देणारीच असण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय ३० ऑक्टोबरला

प्रसिद्ध झालेली सुधारित पैसेवारी

यवतमाळ ४८

कळंब ४८

बाभूळगाव ४८

आर्णी ४७

दारव्हा ४८

दिग्रस ४७

नेर ४६

पुसद ४७

उमरखेड ४८

महागाव ४७

केळापूर ४९

घाटंजी ४८

राळेगाव ४७

वणी ४७

मारेगाव ४७

झरी जामणी ४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com