Teacher Salary : शिक्षण सेवक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढले

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवकांच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Teacher Salary raised
Teacher Salary raised

Maharashtra Teacher Salary News मुंबई : प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवकांच्या मानधनात (Teacher Salary) १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबतचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या शिवाय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका, कटकमंडळे, महापालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये मार्च २००० पासून शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत एस.एस.सी, एचएससी, डीएड अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवाराला २५००, तर अप्रशिक्षित उमेदवाराला १५०० रुपये मानधन देण्यात येत होते.

तर माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, विद्यानिकेतन आणि सैनिकी शाळांतील शिक्षण सेवकांना पदानुसार तीन हजार ते पाच हजार रुपये मानधन दिले जात होते.

त्यात वाढ करून सरसकट सहा ते नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते.

Teacher Salary raised
Value Education : फक्त एक तास मूल्यशिक्षण (?)

दरम्यान, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला तरीही शिक्षण सेवक तोकड्या मानधनावर काम करत होते. या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

यामध्ये शिक्षण सेवकांना किमान कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनाइतके मानधन द्यावे, मानधनाचे निश्‍चित दर चार वर्षांतून एकदा सुधारित करावेत, अशी मागणी होती.

या याचिकेवर निकाल देत शिक्षण सेवकांना १५ ते २० हजार रुपयांचे मानधन द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

Teacher Salary raised
Education System : परदेशी विद्यापीठांबद्दलची ओरड अनाठायी

तसेच याचिकेतील मुद्देही ग्राह्य धरत तसे आदेश सरकारला दिले. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना सुधारित मानधन १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही मानधनवाढ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही दिलासा

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्या तीन वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या मानधनातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये ग्रंथपालांना दोन हजार रुपयांऐवजी १४ हजार, प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार, कनिष्ठ लिपिकांना १० हजार, तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपये मानधन देण्यात येईल. अर्धवेळ पदांच्या मानधनात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.

यामध्ये अर्धवेळ ग्रंथपाल, अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक या पदांच्या मानधनात कुठलीही वाढ केलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com