Value Education : फक्त एक तास मूल्यशिक्षण (?)

त्यावेळच्या सरकारने मूल्यशिक्षण हा विषय शालेय स्तरावर शिकवला जावा असा आदेश काढला होता. सरकारी योजनांचे नेहमी जे होते तेच या ‘मूल्यशिक्षण’ नावाच्या तासाचंही झालं.
Value Education
Value EducationAgrowon

अजिंक्य कुलकर्णी ९४०३१८६११९

मशागत हे सदर वाचणारे वाचक जे सध्या वयाच्या पस्तिशीत आहेत त्यांनी त्यांच्या शालेय वयात विषयांच्या तासांच्या वेळापत्रकात ‘मूल्यशिक्षण’ (Value Education) हा विषय शिकलेला असेलच. त्यावेळच्या सरकारने मूल्यशिक्षण हा विषय शालेय स्तरावर शिकवला जावा असा आदेश काढला होता. सरकारी योजनांचे नेहमी जे होते तेच या ‘मूल्यशिक्षण’ नावाच्या तासाचंही झालं.

Value Education
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

काही वर्षांतच हा तास अभ्यासक्रमातून काढून टाकला गेला. मी शाळेत होतो तेव्हा या मूल्यशिक्षणाच्या तासाला वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वगैरे वगैरे मूल्ये शिकवली जात असत. पण आम्हाला हा विषय शिकवणारे जे शिक्षक होते त्यांना आज आठवलं तर नजरेसमोर काय येतं? ही मूल्य त्या शिक्षकांमध्येच कधी दिसली नाही.

Value Education
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

म्हणजे कित्येक वेळा हे शिक्षक मदिराप्राशन करून आलेले असत. तोंडात गुटख्याचा तोबरा सतत भरलेला असे. दर दहा मिनिटांनी वर्गाच्या खिडकीतून ते आपल्या मुखकमलातून एक दिव्य पिचकारी खिडकीबाहेर टाकत खिडकीच्या बाहेरचा परिसर ‘पवित्र’ करत असत. तर मूल्यशिक्षण हा कोणत्याही शिक्षण व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे.

‘मूल्य म्हणजे नेमकं काय असतं,’ असं जर विचारलं, तर बऱ्याचदा नेमकं काही सांगणं अवघड वाटतं. समाज टिकून राहून प्रगती करेल असा विश्‍वास त्या समाजातल्या लोकांना वाटतो. अशी तत्त्वे जी समाजातील सर्व लोकांनी मान्य केली आहेत, त्याला मूल्य म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीने मूल्य म्हणून स्वीकारलेली तत्त्वही त्या व्यक्तीसाठी इतकी महत्त्वाची असतात, की त्यांच्यासाठी ऐहिक सुखं व्यक्तिगत प्रगती बाजूला सारण्याची ताकद माणसात येते.

अगदी जिवंत राहण्याची मूलभूत प्रेरणाही या तत्त्वासमोर फिकी पडू शकते. कोणतेही मूल्य हे समाजात असं सहज रुजत नसतं. त्यासाठी पिढ्यान् पिढ्यांनी रक्त आटवलेलं आहे. लहान मुलांबाबत बोलताना मूल्य या शब्दाबरोबर अनेकदा संस्कार हा शब्दही येतो. व्यक्तीच्या नकळत तिच्या आजूबाजूला सामाजिक वातावरणातून व्यक्तीचं जे शिक्षण घडत असतं त्याला आपण ढोबळमानाने संस्कार असं म्हणू शकू.

संस्कारातून रुजलेल्या बाबी मनात इतक्या खोलवर गेलेल्या असतात की त्यांचा व्यक्तीच्या आचरणावर मोठाच प्रभाव असतो. म्हणूनच लहान मुलांना संस्कारक्षम वगैरे म्हटलं जातं. आपण लोकशाही स्वीकारली आहे. प्रत्येक व्यक्तीला विचार करता येतो. असा विश्‍वास बाळगल्या खेरीज ही मूल्य आचरणात आणणं कठीण आहे. मूल्य शिक्षण हा काय केवळ एक तास शिकवायचा विषय नाही तर ती आयुष्यभर निरंतर करण्याची साधना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com