Monsoon Update : नैऋत्य मॉन्सून अस्ताकडे

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागावर १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. जेव्हा तापमानात घट होते, तेव्हा हवेचे दाब वाढतात.
Monsoon Update
Monsoon Update Agrowon

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागावर १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. जेव्हा तापमानात घट (Temperature) होते, तेव्हा हवेचे दाब (Air Pressure) वाढतात. हवेचे दाब वाढल्यामुळे वारे अधिक प्रमाणात बाष्प वाहून आणू शकत नाहीत. त्यामुळे पावसाच्या प्रमाण कमी होते. नैर्ऋत्य मॉन्सूनची (Monsoon) वाटचाल अस्ताकडे राहील. त्यानंतर राजस्थानमध्ये हवेचे दाब वाढतील तेव्हा तेथील पावसाचे प्रमाण कमी होऊन पाऊस पूर्णपणे थांबेल. त्यानंतर ईशान्य मॉन्सून किंवा परतीचा मॉन्सून (Monsoon Return Journey) सुरू होईल.

यापुढील काळात हवामानविषयक घडामोडी अतिशय वेगाने घडतील. या सर्व घडामोडी तापमान व हवेच्या दाबात होणारे बदल यावर अवलंबून राहतील. या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडूनच राहील. हवामान घटकांमध्ये होणाऱ्या बदलानुसार त्यानंतर वाऱ्याची दिशा ईशान्येकडून होईल. त्या वेळी महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मॉन्सूनचा पावसास सुरुवात होईल. अचानक पाऊस तर मध्येच उघडीप अशी स्थिती १ ऑक्टोबरपासून पाहायला मिळेल.

कोकण ः

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज (ता. २५) ५ ते १० मि.मी. व उद्या (ता. २६) १२ ते २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत आज (ता. २५) १८ ते ३३ मि.मी. आणि उद्या (ता. २६) १० ते २७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के, तर दुपारची ७५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आज (ता. २५) ५ ते ११ मि.मी., तर उद्या (ता. २६) ८ ते १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८२ टक्के राहील.

Monsoon Update
Monsoon Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणार.

मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत आज (ता. २५) ४ ते ६ मि.मी., तर उद्या (ता. २६) ७ ते १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात तापमानात वाढ होणे शक्य आहे. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत ५१ ते ६० टक्के इतकी कमी राहील. म्हणजेच सूर्यप्रकाश अधिक राहील. मात्र हिंगोली, जालना व नांदेड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज (ता.२५) बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ५ ते ७ मि.मी., तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ११ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२६) सर्वच जिल्ह्यांत ११ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १२ ते १३ किमी राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के, तर दुपारची ८१ ते ८२ टक्के राहील.

Monsoon Update
Monsoon Update : मॉन्सून परतीच्या प्रवासावर

मध्य विदर्भ ः

आज (ता.२५) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६ ते ८ मि.मी., तर उद्या (ता.२६) १४ ते १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १२ ते १३ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ ः

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज व उद्या (ता.२५ व २६) ५ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८५ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत आज (ता.२५) ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२६) कोल्हापूर जिल्ह्यात ५ मि.मी., पुणे जिल्ह्यात १० मि.मी. व नगर जिल्ह्यात ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६६ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

१) सोयाबीन पिकांत तणनियंत्रण करावे.

३) डाळिंब पिकावरील तेल्या आणि अंजीर पिकावरील तांबेरा रोगासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

४) गोठ्यातील जनावरांना व कुक्कुट पक्ष्यांना रोगप्रतिकारक लस टोचून घ्यावी.

५) रब्बी ज्वारीची पेरणी योग्य ओलीवर करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com