Residue Free Agriculture : विषमुक्त शेती हेच हवे लक्ष्य

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, की तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला भारत काही वर्षांत जगद्गुरू होईल. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असून जगभरात भारतातील तरुण मोठमोठ्या पदांवर आहेत.
Residue Free Agriculture
Residue Free AgricultureAgrowon

सोलापूर : शेतीतील रासायनिक खतांच्या (Fertilizer) अतिवापरामुळे पंजाबसारख्या राज्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे विषमुक्त शेतीचे (Residue Free Agriculture) महत्त्व आपल्या लक्षात येईल, हे चित्र थांबवण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करून बदलते हवामान (Climate Change) आणि विषमुक्त शेती हेच लक्ष्य आपल्याला ठेवावे लागेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.

Residue Free Agriculture
Residue Management : औरंगपूरचे शेतकरी करणार शंभर टक्के पाचट व्यवस्थापन

‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘भारत महासत्ता-स्वप्न व वास्तव’ या विषयावर डॉ. भटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय दिवाणजी, सरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे उपस्थित होते. प्रारंभी श्री. दिवाणजी यांनी ‘सकाळ’ची भूमिका विषद करून उपस्थितांचे स्वागत केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, की तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला भारत काही वर्षांत जगद्गुरू होईल. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असून जगभरात भारतातील तरुण मोठमोठ्या पदांवर आहेत. तरुणांनी नवतंत्रज्ञान लवकर आत्मसात करून जगाला योग्य दिशा द्यायला हवी.

Residue Free Agriculture
Residue Free : बाजार व्यवस्था रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबल होणार

‘वातावरणातील बदल’यावर विशेष काम करण्याची गरज आहे. जगातील अन्य देशाच्या तुलनेत भारतात मोठी शहरे उभारू लागली आहेत. तेथील लोकांच्या आरोग्यासाठी विषमुक्त अन्न मिळावे म्हणून आता विषमुक्त शेतीसाठी ‘बॅलन्स इन ॲग्रीक्लचर’वर भरीव काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन बातमीदार किरण चव्हाण, भीष्माचार्य ढवण यांनी केले. आभार सोलापूरचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) अभय सुपाते यांनी मानले.

‘सकाळ’चे नवे मॉड्यूल जगासाठी उपयोगी

युक्रेन युद्धातून जगातील असंतुष्टपणा अधोरेखित झाला आहे. अशावेळी ‘जग हे दिसतं तसं नाही’ हा विचार मांडलेल्या एका शास्त्रज्ञास नोबेल पुरस्कार मिळाला. पण, ते सर्व विचार वेदांमध्ये यापूर्वीच मांडलेले आहेत. वेदातील विचार, विज्ञानातून अध्यात्म, याची जगाला सध्या खूप मोठी गरज आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेला संतुलित जीवनशैली मॉड्यूल (एलआयबी) खूप उत्तम आहे. भविष्यात त्याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम पहायला मिळेल, असा विश्वासदेखील पद्मभूषण डॉ. भटकर यांनी या वेळी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com