Residue Management : औरंगपूरचे शेतकरी करणार शंभर टक्के पाचट व्यवस्थापन

उसाची तोड झाल्यानंतर पाचट जाळण्यापेक्षा त्याची कुट्टी केली तर त्यापासून जमिनीचे नुकसान तर टाळता येते.
Residue Management
Residue ManagementAgrowon
Published on
Updated on

नगर ः उसाची तोड (Sugarcane Harvesting) झाल्यानंतर पाचट जाळण्यापेक्षा त्याची कुट्टी (sugarcane Residue) केली तर त्यापासून जमिनीचे नुकसान (Agriculture Land Damage) तर टाळता येते. पाचटापासून खतही (Residue Fertilizer) मिळते, त्यामुळे यंदा औरंगपूर (ता. पाथर्डी) येथील शेतकऱ्यांनी शंभर टक्के पाचट व्यवस्थापनाचा निर्णय घेतलाय. तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्या पुढाकाराने येथे पाचट कुट्टीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Residue Management
पीक अवशेष व्यवस्थापनाकरिता अवजारे

उसाची तोड झाल्यावर शेतकरी पाचट जाळतात; मात्र त्यामुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे पाचट जाळण्याऐवजी त्याची कुट्टी करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबाबत कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर परिसरात उसाचे क्षेत्र वाढत आहे.

Residue Management
पीक अवशेष व्यवस्थापनासाठी यंत्रे

शेतकऱ्यांनी ऊस पाचटाचे शंभर टक्के व्यवस्थापन करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्या पुढाकाराने पाचटकुट्टी करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सरपंच दिलीप किलबिले, उपसरपंच ईश्वर देशमुख उपस्थित होते. पाचटाची कुट्टी केली तर एकरी चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळते. उन्हाळ्यामध्ये नैसर्गिक आच्छादन होत असल्याने पाणीबचतही होते.

ऊस पाचट मशिनद्वारे पाचटाची कुट्टी केल्यावर एकरी पन्नास किलो युरिया, पन्नास किलो एसएसपी व चार किलो पाचट कुजवणारे जिवाणू याचा वापर केल्यास पाचटाच्या कुट्टीचे लवकर विघटन होऊन त्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. बाळासाहेब किलबिले, दिगंबर देशमुख, जयदेव देशमुख, दीपक काकडे, अमोल देशमुख, मंडळ कृषी अधिकारी मोहनसिंग राजपूत, जगदीश शिरसाठ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शंभर टक्के पाचट व्यवस्थापन करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com