Jackfruit : फणसाच्या चारखंडांपासून पेक्टिन निर्मितीवर संशोधन

‘फणसाच्या टाकाऊ भागांपासून पेक्टिन या बहुपयोगी पदार्थाचे निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान तयार करणे’, याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पवई मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
Jackfruit
Jackfruit Agrowon
Published on
Updated on

दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणात फणसाचे गरे काढून झाल्यावर त्याची चारखंडे टाकून दिली जातात. त्या वाया जात असलेल्या चारखंडावर प्रक्रिया करून त्यापासून पेक्टिन या पदार्थाची निर्मिती कमी खर्चात कशी करता येईल, याचे संशोधन करण्यात येणार असून, हे संशोधन यशस्वी झाल्यास बागायतदारांना या चारखंडापासूनही उत्पन्न मिळणार आहे.

Jackfruit
Agriculture Entrepreneur : कृषी उत्पादक आता उद्योजक व्हावा

‘फणसाच्या टाकाऊ भागांपासून पेक्टिन या बहुपयोगी पदार्थाचे निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान तयार करणे’, याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पवई मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

या फणस प्रक्रियेत टाकाऊ भागांपासून आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या पेक्टिन या बहुपयोगी पदार्थाचा उपयोग हे मूल्यवर्धित पदार्थ जसे जॅम, जेली इत्यादी तसेच औषधोपयोगी वापरात येणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या पदार्थाच्या उत्पादनावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

Jackfruit
Robot For Agriculture : पीक व्यवस्थापनासाठी ५ जी रोबोट

या सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठातील काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था रोहा, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, उद्यानविद्या महाविद्यालय, या संस्थामधील शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. एस. बी. स्वामी, डॉ. एस. बी. पतंगे, डॉ. के. व्ही. व्यंकटेश, डॉ. सुहास झांबरे, डॉ. प्रदीप रेळेकर, डॉ. ए. ए. सावंत, डॉ. एस. बी. कळसे, डॉ. एम. बी. कदम आणि डॉ. के. जी. धांदेसह अन्वेषक यांचा समावेश आहे.

कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. आनंद नरंगलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, डॉ. भरत साळवी, डॉ. यशवंत खंदेतोड, डॉ. एस. बी. स्वामी, डॉ. के. व्ही. व्यंकटेश, डॉ. सुहास झांबरे आदी उपस्थित होते.

फणसाच्या फळाच्या सालीपासून पेक्टिन वेगळे करता येऊ शकते. या पेक्टिन द्रावणाचा उपयोग जेली तयार करण्यासाठी किंवा पेक्टिन पावडर तयार करण्यासाठी केला जातो. पेक्टिन हे जॅम, जेली, मार्मालेड या पदार्थांचा पोत टिकवण्यासाठी वापरले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com