Robot For Agriculture : पीक व्यवस्थापनासाठी ५ जी रोबोट

चीन मधील इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अॅग्रिकल्चर, फुजियन अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस मधील शास्त्रज्ञांनी ५ जी तंत्रज्ञानावर आधारित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट हरितगृहातील फळे भाजीपाला पिकातील अचून व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
Robot For Agriculture
Robot For AgricultureAgrowon

चीन मधील इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अॅग्रिकल्चर, फुजियन अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस मधील शास्त्रज्ञांनी ५ जी तंत्रज्ञानावर आधारित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट हरितगृहातील फळे भाजीपाला पिकातील अचून व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. फुजियन अॅकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या हैक्सिया मॉडर्न अॅग्रिकल्चर डेमॉन्स्ट्रेशन पार्कमधील हरितगृहातील फळे आणि भाजीपाला पिकामध्ये नुकतेच या रोबोटची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. 

Robot For Agriculture
पीक अवशेष व्यवस्थापनासाठी यंत्रे

५ जी रोबोटची वैशिष्ट्ये

- या रोबोटसाठी इंटिग्रेटेड मल्टी-चॅनेल सेन्सर तंत्रज्ञान विकसित केले आहे. या सेन्सर तंत्रज्ञानामुळे या रोबोटचे, कान, डोळे, डोक आणि तोंड मानवाप्रमाणे कार्यरत राहील, असे फुजियन अॅकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चर सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अॅग्रिकल्चरचे उपसंचालक झाओ जियान यांनी सांगितले. 

- रोबोटच्या कानात ७ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे, डोळ्यांत ५ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रोबोटच्या डोक्याच्या वरच्या बाजूला वाऱ्याचा वेग, कार्बन डायऑक्साईड, प्रकाशसंश्लेषण आणि रेडिएशन चा अंदाज येण्यासाठी सेन्सर बसवलेले आहेत.

- हावामानाचा अंदाज येण्यासाठी तसेच वातावरणानूसार पिकाच्या व्यवस्थापनाची समज येण्यासाठी तोंडाखाली तापमान आणि आर्द्रता सेन्सर्स बसवले आहेत. हा रोबोट एखाद्या कार्टून प्रमाणे असून तळाशी असलेल्या चाकामुळे ३६० अंशामध्ये सहजपने हालचाल करु शकतो. त्यामुळे शेतीतील कामे अगदी सहजपणे एकसारखी होतात. या रोबोटला चार्जींगही स्वयंचलित पद्धतीने होते. 

पिक व्यवस्थापनात रोबोट चा फायदा?

इंटिग्रेटेड मल्टी-चॅनेल सेन्सर तंत्रज्ञानामुळे पिकातील किड, रोगाचे प्रमाण, हवामान अंदाज तसेच पिकाचे निरीक्षण करता येईल. त्यामुळे पिकाचे अवस्थेनूसार योग्य व्यवस्थापन कमी वेळात आणि अचूकपणे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मजुरांवर होणारा खर्च वाचेल. त्यामुळे कमी क्षेत्रातूनही चांगले उत्पादन मिळू शकेल. असा 

हरितगृहातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण याशिवाय पिकाला पाण्याची किती व कोणत्या वेळी गरज आहे याविषयीही या रोबोटमुळे माहिती मिळू शकेल. 

Robot For Agriculture
कापूस शेतीत राबावा ‘रोबोट’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com