Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात गुरुवार (ता. ३१) अखेर ९३ हजार २१७ शेतकऱ्यांना ७३८ कोटी ३० लाख रुपये (५३.३४ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात ४४ हजार ४३६ शेतकऱ्यांनी ४६० कोटी १४ लाख रुपये रकमेचे नुतनीकरण केले तसेच ४८ हजार ७८१ शेतकऱ्यांना २७८ कोटी १६ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटपाचा समावेश आहे.
यंदा ऑगस्ट अखेर पर्यंतच्या पीक कर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २८ हजार ५०२ शेतकऱ्यांना २७५ कोटी ४४ लाख रुपये (१३१.२० टक्के) व जिल्हा सहकारी बँकेने ३८ हजार ३६ शेतकऱ्यांना १७० कोटी १९ लाख रुपये (१०३.१९ टक्के) म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे.
तर राष्ट्रीयकृत बँकांनी २५ हजार शेतकऱ्यांना २७२ कोटी ४५ लाख रुपये (३०.५० टक्के) व खाजगी बँकांनी १ हजार ६७९ शेतकऱ्यांना २० कोटी २२ लाख रुपये (१७.४३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांना १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यात राष्ट्रीयकृत बँकांना ८९३ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी ९४ लाख रुपये,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये, खाजगी बँकांना ११६ कोटी ४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचा पिक कर्ज वाटपात हात आखडताच आहे. त्यामुळे या बॅंका सप्टेंबर अखेरपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्याची शक्यता दिसत नाही.
बँकनिहाय पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)
बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या
महाराष्ट्र ग्रामीण बँक २०९.९४ २७५.४४ १३२.२० २८५०२
जिल्हा सहकारी बँक १६१.९१ १७०.१९ १०३.१९ ३८०३६
भारतीय स्टेट बँक ५७२.७७ १८७.८२ ३२.७९ १८०२०
बँक ऑफ बडोदा ६५.९७ १२.२९ १८.६४ १०३३
बँक ऑफ इंडिया ११.८२ ३.५० २९.६१ २९५
बँक ऑफ महाराष्ट्रा ७९.९० ३४.०९ ४२.६७ २७५६
कॅनरा बँक ४७.३८ ८.९३ १८.८५ ९६३
सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.२२ ५.११ ४२.१६ ४३०
इंडियन बँक २४.१४ ३.२४ १३.४२ ३३५
इंडियन ओव्हरसीज बँक १०.४१ ५.२९ ५०.८२ ४४९
पंजाब नॅशनल बँक १०.८६ ०.७० ६.४५ ५२
युको बँक २३.६८ ३.२५ १३.७२ ३२५
युनियन बँक ऑफ इंडिया ३४.२६ ८.२३ २४.०२ ३४१
अॅक्सिस बँक १२.५३ ०.२१ १.६८ २
एचडीएफसी बँक ३८.२७ ३.४४ ८.९९ ३१४
आयसीआयसीआय बँक ३०.२१ १०.४९ ३३.८६ ६९५
आयडीबीआय बँक ३५.३ ६.०८ १७.३६ ६६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.